अरळी ग्रामपंचायत सरपंच अपात्र केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त पुणे येथून अंतरिम स्थगिती मंजूर….
ग्रामपंचायत अरळी (ता. अक्कलकोट) येथील सरपंच अजय उत्तम सगट यांनी सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक सार्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घेतला होता. सदर ग्रामपंचायत निवडणुकीत अजय सगट सरपंच म्हणून निवडून आले होते तसेच लोकअभिमुख सरपंच म्हणून निवडून आल्याचा त्यांचा मान होता. त्यानंतर प्रस्तुत प्रकरणात यातील अर्जदार राम जेठे यांनी देखील सरपंच पदाची निवडणूक अजय सगट यांच्याविरुद्ध लढवली होती. त्यानंतर राम जेठे यांनी सरपंच अजय उत्तम सगट रहात असलेल्या वडिलांची घर हे नियमबाह्य असून तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन पत्र भरतेवेळी सदरची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली असल्याचा आरोप केला होता. सरपंच अजय सगट यांच्या वडिलांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेत अतिक्रमण केले असल्याची बाब लपवून ठेवून शासनाची फसवणूक केली असल्याचा अर्ज मे. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे दाखल केला होता. सदर प्रकरणात निवडून आलेल्या सरपंचांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ची निवडणूक लढत असताना कोणतेही पालन केले नसल्याचे आरोप सदरील अर्जदार यांनी मे.जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात केले होते आणि अशा प्रकारचे अतिक्रमण केले असेल तर त्या संबंधित निवडून आलेल्या उमेदवारास ते सदस्य पदावर राहता येणार नाही अशा स्वरूपाची तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे करण्यात आली होती .सदरील प्रकरणात मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सदरील विवादित जागेची संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी करून तसा अहवाल देखील मागवला होता. दोन्ही पक्षांनी आपले म्हणे मे. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे दाखल केले होते त्यानंतर दिनांक २९/०७/२०२४ रोजी मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी वरील निरीक्षणानुसार व दाखल केलेल्या कागदपत्राच्या अवलोकन केल्यानंतर अरळी (ता. अक्कलकोट) गावचे सरपंच अजय उत्तम सगट यांनी वडील राहत असलेल्या घर हे अतिक्रमित असून व ते गावठाण जागेत त्यांनी अतिक्रमण करून जादा बांधकाम केलेले असून ते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२२ ते २०२७ अंतर्गत सदरील लपवलेली माहिती ही नियमबाह्य असल्याचा तसेच प्रथमदर्शनी पुराव्या अनुस्वार निवडून आलेल्या सरपंचाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१)(ज-३) मधील तरतुदीचा भंग केल्या असल्याचा निष्कर्ष मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिला होता .तसेच अजय सगट यांचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून चालू राहण्यास निरह ठरवण्यात आले होते. परंतु सदरील निकाल विरोधात सरपंच अजय सकट यांनी विभागीय आयुक्त पुणे येथे याचिका दाखल केली होती. तदनंतर पुणे येथील मा. अतिरिक्त विभागीय आयुक्त श्रीमती कविता द्रिवेदी यांनी सदरील प्रकरणात मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या निकाला विरुद्ध अंतरीम स्वरूपाची स्थगिती दिली आहे. सरपंच अरळी अजय सगट यांच्या वतीने ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमनी,ॲड.वैभव बोंगे यांनी काम पाहिले.