अश्लील भाषेत शिवीगाळ करून फेसबुक पोस्ट केल्या प्रकरणी त्या 5 भीमसैनिकांना न्यायालयाने केले निर्दोष मुक्त….
त्यावेळेस संभाजी भिडे सोलापूर मध्ये सभा घेणार म्हणून जाहीर झालेले होते त्या सभेचा विरोध म्हणून काही भीमसैनिकांनी सोशल मीडियावर फेसबुक वर अश्लील भाषेत अपशब्द करून संभाजी भिडे यांना शिवीगाळ केलेली होती त्यामध्ये अमोल बनसोडे नरेंद्र शिंदे सागर सागर उडानशिव राज कांबळे व रोहित आहेरकर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता.
त्या गुन्ह्यामध्ये सर्व भीमसैनिकांतर्फे ऍड अखिल शाक्य यांनी वकील पत्र दाखल केलेले होते. संपूर्ण गुन्ह्याची सुनावणी होऊन पाच साक्षीदार तपासण्यात आले होते.
त्यावेळी भीमसैनिकांतर्फे एडवोकेट अखिल शाक्य यांनी युक्तिवाद केलेला होता. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भंडारी साहेब यांनी प्रत्येकी साडेसात हजार रुपयाच्या जामीनावर निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश केला आहे.
यावेळी सर्व भीमसैनिकांतर्फे ॲड अखिल शाक्य, ॲड हर्षल शाक्य,ॲड अजिंक्य शाक्य,ॲड दर्शना चक्रवर्ती, ॲड अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले
यावेळी एक वकील म्हणून माझी सामाजिक व न्यायालयीन जबाबदारी पार पाडल्याचा एक भीमसैनिक म्हणून गर्व अभिमान आहे.