अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथे दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेतील २ आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर…
अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथे दरोडे टाकण्याचा कट रचून तेथील डॉक्टर कॉटर्सच्या मधील ३ कोटी रुपयांची रोकड पळवण्याचे हेतूने वरील प्रकरणातील आरोपींनी दि.-१० जुलै २०२४ रोजी पहाटे ४.४५ च्या सुमारास विजापूर नाका पोलीस चौकी येथील बीट मार्शल म्हणून कर्तव्यस असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग करीत असताना कुमठे गावात २ पांढऱ्या रंगाचे चार चाकी गाड्या एकामागे एक वेगाने सोरेगावच्या रस्त्याने येत असल्याचे पाहून पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आल्याने सदर कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला असता गाडी चालकानी सदर वाहन न थांबवल्यामुळे त्याचा पाठलाग करून टिकेकर वाडी रेल्वे ब्रिजच्या बोगदा येथे पोलिसांनी सदर वाहन अडवले होते. सदर आरोपींच्या ताब्यातील २ कार याची तपासणी केली असता त्यांच्याकडून एक लोखंडी कटर, एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी, एक ऑक्सिजन गॅस टाकी ,एक लोखंडी कटावणी,एक लोखंडी पाना तसेच विविध प्रकारचे संशयस्पद हत्यार सदर आरोपींकडून हस्तगत करण्यात आले होते.
सदर प्रकरणात एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील आरोपी कनकमूर्ती गोंधळी व प्रवीण बडीगेर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तसेच त्यातील एक जण कुंभारी येथील राहाव्यास असून त्यासोबत संगणमत करून सदरचा दरोड्याचा कट रचल्याचा आरोप व तसेच अश्विनी रुग्णालय कुंभारी येथे गुन्हा करण्याअगोदर सदर आरोपींनी वरील ठिकाणाची पाहणी देखील केली असल्याचा आरोप आरोपींविरुद्ध करण्यात आला होता. आरोपी कनकमूर्ति गोंधळी यास पकडून त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्याच्या इतर साथीदार बद्दल पोलिसांना माहिती दिली होती. सदर आरोपीं कनकमूर्ति गोंधळी (रा.विजापूर-राज्य कर्नाटक) व प्रवीण बडीगेर (रा. चिकरोगी – जि- विजापूर -राज्य- कर्नाटक) यांनी आपला जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.खुने यांनी आरोपींचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. वरील प्रकरणात आरोपी तर्फे ॲड.कदीर औटी ,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमनी, ॲड. वैभव बोंगे यांनी काम पाहिले.