राजकीय

उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद – नीतेश राणे

भाजप आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे. लाव रे तो व्हिडिओ म्हणत नीतेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ माध्यमांसमोर ठेवला. ज्यात ते काँग्रेससमोर झुकणाऱ्यांना हिजडा संबोधतात. हाच दुवा पकडत पाहा आता काँग्रेससमोर उद्धव ठाकरे, संजय राऊत झुकत असल्याची टीका राणेंनी केली. तसेच उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

नीतेश राणे यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. नीतेश राणे म्हणाले, मविआ संविधान मानत नाही. ते शरीया कायदा पाळणारे लोक आहेत. तोच कायदा हे लोक पाळतात. संविधान पाळत असते तर आमच्या राज्यांमध्ये हिंदूंच्या देवतांवर अन्याय झाले नसते. मुंबईचे तेव्हाचे सीपी संजय पांडे हा उद्धव ठाकरेचा जावई म्हणून फिरायचा. तो संजय पांडे रझाकारांबरोबर इफ्तार पार्टी करत असतो.

काँग्रेसजनांची यादी मोदींनी जाहीर केली

नीतेश राणे म्हणाले, प्रियांका गांधींच्या कर्नाटक येथील भाषणाची क्लिप संजय राऊतांनी ट्विटरवर टाकली आहे. ज्यांना भाषणाबाबत काहीच कळले नाही. ज्यांची बौद्धीक पात्रता नाही तेच प्रत्युत्तर देऊ शकतात. राऊतांना मोदींचे भाषण कळते का? जे काँग्रेसवाले पंतप्रधानांना शिव्या देतात त्या काँग्रेसजनांची यादी मोदींनी जाहिर केली. आणि याबाबत प्रियांका गांधीच्या टीकेची लिंक संजय राऊत सारखा शेअर करतो.

आज काँग्रेसमोर कोण झुकत आहे?

नीतेश राणे आता आपल्या प्रत्येक प्रेसमध्ये व्हिडिओ दाखवत राऊक यांच्यावर टीका करत आहेत. आज माध्यमांशी बोलताना नीतेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ समोर आणला. यात ते म्हणतात की, काँग्रेससमोर झुकणारे सगळे हिजडे आहेत. याबाबत नीतेश राणे म्हणाले, बाळासाहेबांनी ठाकरी भाषेत काँग्रेससमोर झुकणाऱ्यांना हिजडा म्हटले होते. आज काँग्रेसमोर कोण झुकत आहे पाहा. उद्धव ठाकरे, संजय राजाराम राऊत. हिजडा असे बाळासाहेब म्हटले होते. मी नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांचे धर्मांतर

नीतेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे धर्मांतर झाले आहे. राजकीय लव्ह जिहाद झाला आहे. 2019 ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे. धर्मांतर करून टाकले. अशा शब्दात नीतेश राणेंनी खालच्या भाषेत टीका केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel