सोलापूर बातमीमहाराष्ट्र
उद्या होणारा बहुजन मुक्ती पार्टीचा आंदोलन रद्द… प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.
सोलापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे धार्मिक स्थळाची मोडतोड झाली. यातील समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सोलापुरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने पुनम गेट जिल्हा परिषद या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार होते. पोलीस प्रशासनाने केलेली विनंती व कायदा सुव्यवस्था बनून ठेवण्याकरिता बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सदर आंदोलन रद्द करण्यात आले असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.