सोलापूर बातमीसोलापूर महानगरपालिका

उपायुक्त मच्छिंद्र घोलप, घनकचरा मक्तेदार व सर्व संबंधितांवर कारवाईची मागणी.

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल जवळ रस्त्यावरील कचरा ,जनावरांची अनधिकृत कत्तलीच्या सार्वजनिक उपद्रवाबद्दल जिल्हाधिकारी, पोलीस व सोमपा आयुक्तांकडे तक्रार

सिव्हील हॉस्पिटल जवळील आडके हॉस्पिटलच्या जवळ 24 तास रस्त्यावर अस्ताव्यस्त कचरा ,बीडयाची पाने टाकलेली असतात. त्यामुळे तेथे कुत्रे,
गाढवे व इतर मोकाट जनावरांचा वावर होत आहे. शेजारीच येथील एका नगरसेवकाने अनधिकृत पणे मुतारी बांधलेली आहे. पण त्याचा गैरवापर होऊन सर्रास लोक रस्त्यावरच लघुशंका करणे, रस्त्यावर शौचास बसणे अशा घाणेरड्या प्रकरणामुळे येथून जाणे मुश्किल झाले आहे व रहदारीस अडथळा होत आहे. शेजारीच सिव्हिल हॉस्पिटल व निवासी डॉक्टरांचे वसतीगृह आहे ,तसेच बाजूलाच अनेक हॉस्पिटल्स व इमारती आहेत.
त्यातच दि. 27/07/2024 रोजी येथे अनधिकृत पणे बोकडांची विक्री करण्यात आलेली आहे. दुसऱ्या दिवशी आषाढ सणानिमित्त परिसरातील लोकांनी प्रतिबंध असताना सुद्धा या बोकडांची कत्तल घरी करून त्याची घाण या ठिकाणी टाकलेली आहे .त्याबाबत डॉ.संदीप आडके यांनी मा. जिल्हाधिकारी , सोमपा आयुक्त व सदर बजार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आहे.सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवणे ,शहराचे विद्रूपिक करणे, अनधिकृत प्राण्यांची विक्री व कत्तल करणे यावर फौजदारी कलम 510,133 व महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 प्रमाणे कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. तसेच कर्तव्यात कसूर करण्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप ,मुख्य सफाई अधीक्षक एन सी बिराजदार, सफाई निरीक्षक अन्वर शेख ,प्रकाश नरळे ,जितू मोरे व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांवर तसेच घनकचरा व्यवस्थापन मक्तेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
सोलापूर स्मार्ट सिटीत असे घाणेरडे प्रकार सर्व ठिकाणी होताना दिसत आहेत. यावर तात्काळ प्रतिबंधन न झाल्यास पुढील अतिशय कठोर पावले उचलण्याचा इशारा डॉ.आडके यांनी दिलेला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel