खेळमहाराष्ट्रसोलापूर बातमी

एकता ट्रॉफी ओपन मिनी फुटबॉल चॅम्पियनशीप उत्साहात संपन्न

कोंढवा, दिनांक 3/8/24 रोजी हसन भाई शेख प्रतिष्ठान पुणे आणि एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकता ट्रॉफी ओपन मिनी फुटबॉल 5A साईड चॅम्पियनशिप 2024’ चे आयोजन कोंढवा येथे ग्रॉस रूट मैदान वर करण्यात आले होते. सदर आयोजित एकता करंडक स्पर्धेत एकूण 25 फुटबॉल संघांनी सहभाग घेतला होता.
एकता करंडक फुटबॉल चॅम्पियन स्पर्धा भरवण्यासाठी मागील उद्देश लोकांमध्ये शारीरिक आरोग्यबद्दल जागरुकता निर्माण करणे, जीवनातील खेळाचे महत्व अधोरेखित करणे आणि फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देणे हा आहे, असे आयोजक मुजाहिद रायली सरांनी स्पष्ट केले.
एकता करंडक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामध्ये प्रमुख पाहुणे 1) मोहसीन भाई शेख
( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर) व (संस्थापक अध्यक्ष एम बी एस ग्रुप पुणे).(संस्थापक अध्यक्ष हसन भाई शेख प्रतिष्ठान पुणे)
२) हाजी तोसिफ भाई शेख (उद्योजक)
३) हाजी फिरोज भाई शेख (अध्यक्ष: ऑल कोंढवा सोशल फाउंडेशन पुणे), ४) कुदरतउल्लाह बेग सर (अध्यक्ष: दारे अरकम एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट पुणे), ५)समीर भाई पठाण सर (अध्यक्ष: नागरिक अधिकार मंच पुणे), रईस भाई सुंडके सर (मा. नगरसेवक), डॉ. सोबीया शेख (एम.पी.टी फिजिओ थेरपिस्ट) आणि आयोजक मुजाहिद रायली सर (अध्यक्ष: एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे), त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणेचे अध्यक्ष मुजाहिद रैली सर यांनी कुराण पाक आणि राष्ट्रगीत म्हणून एकता ट्रॉफी ओपन मिनी फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 च्या सुरुवातीची घोषणा केली…
या स्पर्धेत लाला ब्रदर्स एफ सी हा संघ विजेता ठरला. विजेत्या संघाला ११०००/- रुपये तसेच एकता ट्रॉफी व मेडल्स देण्यात आले. गलॅकटीकॉस एफ सी हा संघ उपविजेता ठरला आहे. या संघाला ७०००/- रुपये तसेच एकता ट्रॉफी व मेडल्स देण्यात आले. तर तिसरा विजेता संघ मिलान पीस एफ सी हा ठरला. या संघाला ५०००/- रुपये तसेच एकता ट्रॉफी व मेडल्स देण्यात आले. सदर स्पर्धेत बेस्ट स्कोर करणारा अनिकेत पवार हा खेळाडू ठरला. तर बेस्ट गोलकीपर ताबिश सूंडके हा खेळाडू ठरला. तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून सत्तय्यम यादव या खेळाडूंनी मान मिळवला. ही स्पर्धा प्रत्यक्षात आणण्यासाठी एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन कोंढवा पुणेचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे यांच्या नवीन जर्सीचे उद्घाटनही समीर भाई पठाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अफफान भाई शेख, शफी अंबिलखिचडे सर, मतीन बांगी सर, जुबेर भाई शेख, अझहर भाई कुरेशी, रियाज अदोनी सर, खालिद भाई रैली, बब्बू भाई रैली, जावेद चाचा, अब्दुल रजाक भाई, वसीम भाई शेख, हाजी सैफुल्ला भाई, अलीम भाई बेग. , नोमान शेख, असद भाई शेख, आयुब भाई खान, अनफाल शेख सर, शहीद भाई शेख, इश्तियाक भाई शेख, अर्शद पिरजादे, इम्रान शेख, मुबीन बागबान. सरफराज भाई माल्को, इरफान नदाफ, आणि इम्तियाज तांबोळी. यांना सनमान ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आले
अंपायरचे काम अम्मार सर, उझैर सर, मतीन बांगी सर, मुजाहिद रैली सर यांनी पाहिले. ही एकता करंडक खुली मिनी फुटबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणेच्या संघाने परिश्रम घेतले…
अफ्फान शेख सर( कार्याध्यक्ष एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे) यांनी सगळ्यांचे आभार मानले..

साभार
एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा, पुणे.
संस्थापक अध्यक्ष मुजाहिद रायली सर आणि मित्र परिवार.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel