महाराष्ट्र

“एकत्र होऊ द्या नाहीतर, वेगळे होऊ द्या मते तर लोकच देणार -बच्चू कडू

देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यावर महाराष्ट्रातील विधानसभेचं बिगुल वाजतं. पण, २०२४ साली लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपाने पक्षाच्या नेतृत्वाला एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाचा भाजपा नेतृत्व विचार करत असून, यावर शिक्कामोर्तब झाल्यास लोकसभेबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होतील. यासंदर्भात ‘द हिंदू’ने वृत्त दिलं आहे.

लोकसभा निवडणूक एप्रिल-मे २०२४ साली होणार आहेत. तर, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये अपेक्षित आहे. पण, राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. यावर आता प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे.

“एकत्र होऊद्या नाहीतर, वेगळे होऊद्या मते तर लोकच देणार आहेत. पाकिस्तानची लोक थोडीच मतदान करणार आहेत,” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी विधिमंडळाबाहेर एका प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी गोंधळ घातला, याबद्दल विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “सत्ता नसली की शेतकरी आठवतो. सत्ता असली की धनाढ्य लोकांबरोबर यांची मैत्री होते. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना मदत भेटली पाहिजे, यात दुमत नाही. लवकर आणि चांगल्या पद्धतीने मदत दिली पाहिजे. परंतु, किती नाटक करणार, विरोधात असल्यावर शेतकरी आठवला, सत्तेत होता तेव्हा दादांना शेतकरी आठवला नाही,” असा टोला बच्चू कडूंनी अजित पवारांना लगावला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel