“एकदा युवकाला संधी द्या, प्रभागाचा कायापालट करू” – मोसिन शेख उर्फ नेता

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त झाले असून प्रभागनिहाय प्रचाराला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्येही प्रचार शिगेला पोहोचला असून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून अधिकृत उमेदवार मोसिन शेख उर्फ नेता यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.
काल मोसिन शेख उर्फ नेता यांनी माँ आयशा नगर व भूदेवी नगर परिसरात होम-टू-होम प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला. घराघरात जाऊन मतदारांच्या समस्या ऐकून घेत त्यांनी पाणी, रस्ते, गटारी, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या.
प्रचारादरम्यान बोलताना मोसिन शेख म्हणाले की, “गेल्या 25 वर्षांपासून प्रभागातील नागरिकांनी काही ठराविक लोकांनाच संधी दिली, मात्र अपेक्षित असा विकास झाला नाही. आता बदलाची गरज आहे. एकदा युवकाला संधी द्या. मी निवडून आलो तर संपूर्ण प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही.”
युवक नेतृत्वामुळे नवीन विचार, ऊर्जा व पारदर्शक कारभार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच प्रभागातील रखडलेली विकासकामे, दुर्लक्षित वस्त्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव याकडे लक्ष वेधत मोसिन शेख यांनी विकास हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे सांगितले. नागरिकांच्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार असून प्रत्येक प्रश्नासाठी सतत उपलब्ध राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या होम-टू-होम प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक युवक व महिला प्रचारात सहभागी होत आहेत. येत्या काळात प्रभागातील इतर भागांतही अशाच प्रकारे थेट संवाद साधून प्रचार सुरू ठेवणार असल्याचे मोसिन शेख उर्फ नेता यांनी यावेळी सांगितले….



