महाराष्ट्रशैक्षणिक

विनायक भगत यांच्या स्मरणार्थ कसबा पेठ, पुणे येथील सेमी उर्दू शाळेतील १६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही दोन उपक्रम राबवत असतो. एक जकात शिक्षणासाठी दुसरा आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी एक उपक्रम रमजान महिन्यात असतो तर दुसरा उपक्रम बकरी ईदच्या वेळी. दोन्हीही उपक्रमात महाराष्ट्र भरातून सर्वच धर्मीय या उपक्रमात सामील होतात. ही जी काही शैक्षणिक मदत तुम्हाला मिळत आहे ती सर्व धर्मीयांकडून मिळालेली आहे. तुमचे शिक्षण आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक साहित्य यामुळे थांबू नये हा त्यांचा मुख्य उद्देश असल्याने ते ही मदत करतात. त्याबद्दल आभार जर मानायचेच असतील तर त्या सर्वांचे माना जे या उपक्रमात सामील झाले. मी फक्त नाममात्र आहे.

आज सेमी उर्दू शाळांमध्ये मुलींचे प्रमाण ८० % आहे. मुलगा झाला की इंग्रजी शाळेत आणि मुलगी झाली की सेमी उर्दू शाळेत. हा पायंडा समाजाने बंद करायला हवा. मुलगा आणि मुलगी दोन्हींना समान शिक्षण द्यायला हवे. मुलींच्या शिक्षणात खूप साऱ्या अडचणी असतानाही प्रत्येकच क्षेत्रात मुस्लिम मुलांपेक्षा मुली जास्त पुढे जाताना दिसत आहेत. जी कौतुकाची बाब निश्चितच आहे. मात्र मुलांची शिक्षणाविषयी असलेली अनास्था दूर करायला हवी. ७ वी किंवा १० वी पर्यंत शिकून शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण समाजात बरेच आहे. त्यानंतर ही मुले पडेल तर काम करण्याकडे लक्ष देतात. आई वडिलांना पण घरात पैसे येतात म्हणून याचे काहीही वाटत नाही. पण आपण या नादात पिढी बरबाद करतोय याची त्यांना जाणीव नसते. ती जाणीव करून देणे आपले काम आहे. जेवढे संस्कार मुलींना घरातून देण्याच्या भानगडीत पालक असतात तेवढेच संस्कार मुलांनाही देणे गरजेचे आहे. संस्कारांची शिदोरी एकट्या मुलींसाठी नाही.

आज या फ्लेक्स वर फोटो कोणाचा लावला आहे ? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर तो फोटो आमचे प्रिय मित्र विनायक भगत यांचा आहे. या व्यक्तीने कधीही समाजात भेदाभेद केली नाही. सर्वांशी प्रेमाने ही व्यक्ती वागली. उलट जे द्वेष पसरवतात त्यांना ही व्यक्ती शेवटपर्यंत समजावत राहिली. यांची आणि माझी खूप घट्ट मैत्री होती. दुर्दैवाने त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. ही व्यक्ती आपल्या प्रत्येक उपक्रमात सामील व्हायची त्यामुळे या वर्षीचा पूर्ण उपक्रम आपण यांच्या स्मरणार्थ राबवत आहोत.

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel