महाराष्ट्र

एका दिवसात 60 हजार महिलांनी केला प्रवास : एसटीत 50 टक्के सुट

 

महिलांचा सन्मानासाठी राज्यसरकाने एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी भाडेदरात सरसकट ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. या याेजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. १८ मार्च राेजी विभागातून या याेजनेतर्गंत तब्बल ६० हजारांहून अधिक महिलांनी प्रवास करत सवलतीचा फायदा घेतला. राज्यशासनाच्या या सवलतीमुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कष्टकरी, गृहींणीना मदत व्हावी, त्यांची अर्थिक बचत व्हावी यासाठी यंदा अर्थसंकल्पात उपमुख्यंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सरसकट ५० टक्के भाडे दरात सवलत जाहीर केली हाेती.

याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर १७ मार्च रात्री १२ वाजेपासून ही सवलत पूर्ण राज्यात लागू करण्यात आली. अधिकाधिक महिलांनी या याेजनेचा लाभ घ्यावा याबाबत राज्यशासनासह एसटी महामंडळाच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करण्यात आली. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.विभागातून मालेगाव, धुळे,सटाणा , आैरंगाबाद, पुणे, दादर यासह विविध मार्गावर धावणाऱ्या बसेसच्या माध्यतातून १८ मार्च राेजी तब्बल ६०२६६ महिलांनी ५० टक्के सवलत भाडेदराअंतर्गत प्रवास केला आहे. आगामी काळात या संख्येत आणखी वाढ हाेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

खासगी वाहतूकदाराकडे प्रवाशांनी मिळवली पाठ

महिलांना सरसकट ५० टक्के प्रवासी भाडे दरात सवलत जाहीर केल्याने यांचा फटका खासगी प्रवासी वाहतूकदारांना बसला आहे. प्रवाशासाठी एसटी बसेसलाच प्राधान्य दिले जात असल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे. मात्र राज्यशासनाच्या या निर्णयामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणारे चांगलेच अडचणीत सापडले आहे.

शहर बससेवेमध्येही ५० टक्के सवलत देण्याची मागणी

शहरात पालिकेच्या माध्यमातून सिटीलिंकद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. राज्यशासनाप्रमाणे पालिकेने देखील सिटीलिंक बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ५० टक्के सवलत द्यावी अशी मागणी आता विविध संघटनासह नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel