एमआयएम नेते फारूक शाब्दीनी मध्य विधानसभा मतदारसंघात रणशिंग फुकले

सोलापूर शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघ अतिशय हॉट मतदार संघ म्हणून उदयास आला आहे.सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांची नजर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर आहे.काँग्रेसच्या प्रणिती शिंदे तीन वेळा आमदार म्हणून मध्य विधानसभा मतदारसंघातुन निवडून आल्या आहेत.2014 आणि 2019 अशा दोन वेळा झालेल्या निवडणुकीत प्रणिती शिंदेना ऑल इंडिया मजलिस ए इतिहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमच्या उमेदवाराने जबरदस्त टक्कर दिली होती.एमआयएमच्या दोन्ही उमेदवारांचा मागीलदोन निवडणुकीत निसटता पराभव झाला होता.आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची चूकभूल नको हा ध्यास मनात घेऊन एमआयएम नेत्यांनी डोअर टू डोअर भेटीगाठी सुरू केल्या आहेत.सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख फारूक शाब्दी व त्यांचे कार्यकर्ते शहरातील मध्य विधानसभा मतदार संघात सक्रिय झाले आहेत.गुरुवारी रात्री फारूक शाब्दी यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.स्नेह मेळाव्यातुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.फारूक शाब्दी यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे.मध्य विधानसभा मतदारसंघात फारूक शाब्दी प्रत्येक परिसर पिंजून काढत आहेत.
*भाजपचा डोळा मध्य विधानसभा मतदारसंघावर-
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मध्य विधानसभा मतदार संघातून जवळपास 89 हजार मतं मिळाली होती,त्यामुळे भाजपच्या नेत्यांची सुद्धा शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर नजर आहे.शिवसेनेच्या नेत्यांना देखील मध्य विधानसभा मतदारसंघ हवा,त्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघ हॉट होत चालला आहे.माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी जाहीर पत्रकार परिषद घेत स्वतःची उमेदवारी घोषित केली आहे.फारूक शाब्दी हे यांनी अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केला आहे.
*एमआयएम नेत्यांनी भेटीगाठी सुरू केल्या-
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएम नेते फारूक शाब्दी हे पाच वर्षांपासून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यां मार्फत जनतेत सातत्य ठेवून आहेत.2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फारूक शाब्दी यांनी प्रणिती शिंदे विरोधात एमआयएमकडून निवडणूक लढवली होती.फारूक शाब्दी यांना 39 हजार 700 मते मिळाली होती तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना 54 हजार मतं मिळाली होती.2019 आणि 2014 अशा दोन वेळा एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवण्यात यश आले होते.यंदाच्या विधानसभा निवडणूकित एमआयएमचे फारूक शाब्दी पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. एक महिन्यापासून एमआयएमचे नेते व कार्यकर्ते मध्य विधानसभा मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.मतदान यादीत नावे समाविष्ट करा,अशी जनजागृती करत आहेत.एमआयएमचे नेते भेटीगाठी करत असल्याचे पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.
*सोलापूर शहर मध्य मधून इच्छुकांची भाऊगर्दी-
सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ मुस्लिम,पद्मशाली,मोची या समाज बांधवांचा विधानसभा क्षेत्र आहे. काँग्रेस कडून बाबा मिस्त्री(मौलाली सय्यद),जुबेर कुरेशी ,चेतन नरोटे,अंबादास करगुळे आदी नावे चर्चेत आहेत.एमआयएम कडून फारूक शाब्दी यांनी तयारी सुरू केली आहे. भाजपकडून राम सातपुते यांचे नाव पुढे येत आहेत.राष्ट्रवादी अजित पवार गटा कडून जुबेर बागवान हे इच्छुक आहेत.शिंदें गट शिवसेनेकडून ज्योती वाघमारे,मनीष काळजे,आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे.सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणूकीत राज्यात चर्चेत येणार आहे,कारण खासदार झालेल्या प्रणिती शिंदे याच मतदार संघातून तीन वेळा आमदार राहिल्या आहेत.या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.