महाराष्ट्र

VVIP जागांचे ओपिनियन पोल: पीएम मोदी जिंकतील; सोनिया गांधी, डिंपल यादव, स्मृती इराणी आणि वरुण गांधी यांची स्थिती जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सी व्होटरने ओपिनियन पोलद्वारे लोकांचा मूड जाणून घेतला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता सर्वेक्षणात वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे, विरोधी आघाडी इंडियाही जोरदारपणे पुढे जाताना दिसत आहे.

भाजप तयारीत व्यस्त असताना काँग्रेसही तयारीला लागली आहे. दिल्ली बिहार, जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या नेत्यांसोबत काँग्रेस नेतृत्वाची बैठक झाली. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. या राजकीय वातावरणात एबीपी न्यूजने व्हीव्हीआयपी जागांची स्थिती जाणून घेतली आहे. त्यात वाराणसी, अमेठी, लखनौ, गौतम बुद्ध नगर आणि आझमगडच्या जागांचाही समावेश आहे.

राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी –
सर्वेक्षणानुसार, पीएम मोदी पुन्हा वाराणसीमधून मोठ्या फरकाने विजयी होतील. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनौ लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील. तसेच गोरखपूरचे भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन हे चांगल्या फरकाने पुढे असतील.

स्मृती इराणी, डिंपल यादव आणि सोनिया गांधी –
स्मृती इराणी अमेठीहून विजयी होतील. ही जागा गांधी घराण्याचा बालेकिल्ला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. डिंपल यादव मैनपुरी मतदारसंघातून पुढे असू शकतात, असा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. रिटा बहुगुणा जोशी अलाहाबादमधून आघाडीवर राहतील. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीमधून पुन्हा निवडणूक जिंकतील, अशी आशा या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.

वरुण गांधी मोठ्या फरकाने विजयी होतील –
अजय मिश्रा टेनी लखीमपूर मतदारसंघातून थोड्या फरकाने विजयी होऊ शकतात, असे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. तर वरुण गांधी पिलीभीतमधून मोठ्या फरकाने पुढे आहेत. तसेच साक्षी महाराज उन्नावमधून थोड्या फरकाने विजयी होऊ शकतात. राजेंद्र अग्रवाल मेरठमधून मोठ्या फरकाने विजयी होऊ शकतात. अफजल अन्सारी यांना गाझीपूर मतदारसंघातून विजय मिळणे कठीण होऊ शकते.

गिरीराज सिंह –
बेगुसराय मतदारसंघातून गिरिराज सिंह चांगल्या मताधिक्याने विजयी होऊ शकतात, असा अंदाज पोलमध्ये व्यक्त केला जात आहे. पाटलीपुत्रची जागा जिंकणे भाजपला कठीण होऊ शकते, म्हणजेच ही जागा धोक्यात आली आहे. सध्या रामकृपाल यादव या जागेवरून खासदार आहेत.

तसेच, पूर्व चंपारणमधून राधामोहन सिंग आणि आराहमधून आरके सिंग हे अल्प मताधिक्याने लोकसभा निवडणूक जिंकू शकतात. उजियापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नित्यानंद राय तर बक्सरमधून अश्विनी चौबे थोड्या फरकाने आघाडीवर राहतील. याशिवाय अन्नपूर्णा देवी कोडरमा मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी होऊ शकतात.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती बनवण्यात व्यस्त आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास सुमारे अडीच महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी 2024 चा पहिला ओपिनियन पोल घेतला आहे. या पोलमध्ये त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel