ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 09 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीशांनी भारत सोडून जावे यासाठी भारत छोडो चा ठराव पास केला. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रोजी “चले जाव” व “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला होता. यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध जनतेत रोष पसरून आंदोलनाचा जोर पकडला. अनेक क्रांतिकारक, स्वातंत्रसैनिक यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन ब्रिटीशांना हद्दपार केले. स्वातंत्र्यसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी व चले जाव चळवळची आठवण म्हणून आणि युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस गणेश डोंगरे यांच्या व काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली 8 ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला रात्री 11:00 वाजता वाजता पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मशाल रॅलीचा आरंभ करण्यात आला.
सोलापूर शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत बलिदान चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
या ऑगस्ट क्रांती मशाल रॅलीत कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,अनंत म्हेत्रे,सरफराज काझी,प्रविण जाधव, श्रीकांत वाडेकर, विवेक कन्ना, शशिकांत शेळके, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, अनंत म्हेत्रे, मनोहर चकोलेकर, दिनेश डोंगरे, आशुतोष वाले,आदित्य म्हमाणे, संदेश कांबळे, सुभाष वाघमारे, तिरुपती परकीपंडला, अभिलाषा अचुगटला, गणेश नागशेट्टी,चंद्रकांत नाईक,नूरअहमद नालवार,अजय जाधव, कृष्णा नाईक, राजेश शेख,पृथ्वीराज नरोटे, शंकर नरोटे, रूपेश गायकवाड,श्रीनिवास परकीपंडला,गणेश म्हेत्रे,अमोल शिंदे,मयूर कांबळे,मयूर व्हटकर,सूरज शिंदे,गणेश देवसाने उपस्थित होते.