मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने फुलांचा वर्षाव…

याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरात लोधी समाज बांधवांचे रंगपंचमी हे अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी होत असते” शंभर वर्षाची परंपरा जपत लोधी समाज बांधवांच्या वतीने बैलगाडी आणि रंग गाडीचे नियोजन करण्यात येत असते बैलगाडी मध्ये बसून एकमेकांवर रंगाचे उधळण करत एकमेकांवर पाण्याचा वर्षाव करण्यात येत असतो” लोधी समाज बांधव रंगगाडी मिरवणूक हे जसे लष्कर परिसरातील जगदंबा चौक या ठिकाणी आले” तसे मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने रंगगाड्यावर फुलांचे वर्षाव करत त्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या” दरम्यान यावेळी अनेकांचे भुया उंचावले” डोक्यावर टोपी” हातात फुलं आणि मुस्लिम बांधवांचे फुलांचे वर्षाव पाहून सारेच थक्क झाले” जसे जसे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने फुलांचे वर्षाव करण्यात येत होते” तसे तसे हिंदू समाज बांधवांच्या वतीने टाळ्यांचा एकच गजर करत होते” जय श्रीराम च्या घोषणा हम सब एक है च्या घोषणा यावेळी ऐकू यास मिळाले दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने वाहिद बिजापुरे यांनी रंगगाडी मिरवणुकीचे स्वागत करत रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या तर माजी नगरसेवक बडूरवाले यांनी मुस्लिम समाज बांधवांचे आभार मानले पहा…