महाराष्ट्र
कपाळावर नाणे चिकटवून नरेंद्र मोदींनी दाखवली जादू
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा लहान मुलांसोबत विनोद करताना, खेळताना दिसतात. पीएम मोदी लगेच मुलांमध्ये मिसळतात. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते दोन मुलांसोबत खेळताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये पीएम मोदी दोन मुलांना कपाळावर नाणे चिटकवून जादू दाखवतानाही दिसत आहेत.
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये पीएम मोदी एका कुटुंबाला भेटल्याचे दिसत आहे. कुटुंबासह दोन मुलेही पंतप्रधानांना भेटण्यासाठी आली होती. पीएम मोदींनी मुलांना हसवण्यासाठी त्यांच्यासोबत खेळायला सुरुवात केली. पंतप्रधानांनी आधी दोन्ही मुलांचे डोके धरले आणि एकमेकांवर आपटले. यानंतर पीएम मोदींनी कपाळावर नाणे चिकटवण्याची युक्तीही सांगितली.