कामगार व औद्योगिक न्यायालय इतर शासकीय कार्यालय स्थलांतराबाबत राज्याचे कामगार आयुक्तांना अहवाल सादर

सोलापूर : कामगार व औद्योगिक न्यायालय आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर व इतर ४ कार्यालय मोहोळ तालुक्यात स्थलांतर झाल्यामुळे कामगार संघटना महासंघाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा चालू होता. मतदानानंतर रस्ता रोको आणि इतर आंदोलनाचा मार्ग स्विकारण्यात आला होता. शासनाने यासंदर्भात आंदोलन न करता शांततेचा मार्ग स्विकारावा असे सांगितल्यामुळे दिनांक ०९ मे रोजी सकाळी ११.३० वाजता सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर सुधीर गायकवाड यांनी कामगार संघटना महासंघासोबत बैठक आयोजित केली होती.
याबैठकीत कामगार संघटना महासंघाच्या वतीने महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद, शिवसेना (शिंदे गट) कामगार आघाडीचे अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळी यांनी सांगितले की, ०७ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी कामगार भवन बांधण्यात यावे, याबैठकीत कामगार व औद्योगिक न्यायालय व सहाय्यक कामगार आयुक्त आणि इतर ४ शासकीय कार्यालय कामगार भवनाच्या छताखाली एकत्रित सर्व कार्यालय बांधण्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मुख्यालयाच्या ठिकाणीच कामगार भवन उभारण्यात यावे, ८ पर्यायी खुली जागा ४ इमारती उपलब्ध असलेले जागा साथी बशीर अहमद यांनी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले. यावेळेस सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी महासंघाची बाजू समाधानकारक ऐकून घेतली. राज्याचे कामगार आयुक्त यांना दिनांक ०९ मे २०२४ रोजी अहवाल पाठावला आहे. कामगार आयुक्तालय मुंबई येथे महासंघाबरोबर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी महासंघाचे शिष्टमंडळास सांगितले. त्यामुळे तात्पुर्ता आंदोलन स्थगित केल्याचे महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी यावेळेस सांगितले.
यावेळेस महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद, शिवसेना (शिंदे गट) कामगार आघाडीचे अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळी, समता मजदूर युनियनचे अध्यक्ष साथी छगन पंढरे, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे सिध्दार्थ बोराडे, मिलिंद गायकवाड, जनरल कामगार युनियनचे कॉ. एजाज शेख, महाराष्ट्र लेबर युनियनचे अशपाक शेख उपस्थित होते.