सोलापूर बातमीसोलापूर निधन वार्ता
किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांचे निधन…
अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद सिद्राम झळके (वय ४३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी पहाटे दोन वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. कंदलगाव येथे दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
माजी आमदार कॉम्रेड नरसाय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. झळके यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने केली. अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकरी व जनसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारे एक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे