खेळजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमहाराष्ट्र

कोमल दारवटकर, संध्या सुरवसे महाराष्ट्र खो-खो संघाचे कर्णधार…

वडोदरा, गुजरात येथील अस्मिता खेलो इंडिया महिला लीग स्पर्धेत महिला व मुलींचे संघ भाग घेणार...

पुण्याची कोमल दारवटकर व धाराशिवची संध्या सुरवसे यांची अनुक्रमे महाराष्ट्र महिला व मुली गट खो- खो संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मुली गट स्पर्धा दि. २८ ते २९ सप्टेंबर या कालावधीत व महिला गटाची स्पर्धा दि. ३० सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत वडोदरा, गुजरात येथे होणार आहेत. यासाठी दोन्ही संघ महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी जाहीर केले. दोन्ही संघास महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. गोविंद शर्मा यांनी शुभेच्छा दिल्या.

दोन्ही संघाचे स्पर्धापूर्व सराव शिबिर ओम साईश्वर सेवा मंडळ, पेरू कंपाउंड, मनोरंजन मैदान, लालबाग, मुंबई येथे होणार आहे.
निवड झालेल्या मुली संघांचे सराव शिबिर २७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या खेळाडूंनी स्पर्धापूर्व सराव शिबिरात सकाळी ७.०० वाजेपर्यंत श्रीकांत गायकवाड (मो.९९६९३९१९२५ )अथवा नंदिनी धुमाळ (९३७२९७८२३०) यांच्याशी संपर्क साधावा.

निवड झालेल्या महिला खेळाडूंचे सराव शिबिर दिनांक २८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या खेळाडूंनी स्पर्धापूर्व सराव शिबिरात सकाळी ९.०० वाजेपर्यंत डलेश देसाई ( मो. ९८२११४७७४६ यांच्याशी संपर्क साधावा. दोन्ही स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी मॅट शूज, आधार कार्ड, बँक पासबुक व २ फोटो सोबत आणावेत.

महाराष्ट्राचे संघ असे-
महिला गट : कोमल दारवटकर (कर्णधार), हृतिका राठोड,प्रियंका इंगळे( सर्व पुणे), रेश्मा राठोड, किशोरी मोकाशी, दीक्षा सोनसुरकर ( सर्व ठाणे), संपदा मोरे, ऋतुजा खरे, अमृता माने ( सर्व धाराशिव), पायल पवार (रत्नागिरी), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), श्वेता वाघ (पुणे), देविका अहिरे (मुं. उपनगर), सेजल यादव (मुंबई), शिवानी यड्रावकर (धाराशिव), प्रशिक्षक : पुष्कर बर्वे (पुणे).

मुली गट : संध्या सुरवसे – (कर्णधार), अश्विनी शिंदे, सुहानी धोत्रे, मैथिली पवार, तन्वी भोसले (धाराशिव), पूर्वा वाघ (पुणे), स्नेहल लामकाने (सोलापूर), सानिका चाफे (सांगली)
कांचन हलगरे (ठाणे), आकांक्षा हरकल (छत्रपती संभाजी नगर), सलोनी दुदम (पालघर ), धनश्री तामखेडे (सांगली), सुषमा चौधरी, सरिता दिवा (नाशिक), अलका वळवी (नंदुरबार), प्रशिक्षक : विजय जाहेर (बीड), व्यवस्थापिका : नंदिनी धुमाळ (मुंबई).

वाडीकुरोलीची स्नेहल लामकाने महाराष्ट्र संघात

अस्मिता खेलो इंडिया महिला लीग स्पर्धेसाठी ज्युनियर गट मुली खो खो संघातून वाडीकुरोलीच्या ( ता. पंढरपूर) कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबच्या स्नेहल लामकाने हिची निवड झाली आहे. तिचे सोलापूर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel