सोलापूर राजकीयमहाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमी
खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील पापरी व खंडाळी या गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडविण्याची ग्वाही दिली…
सोलापुर लोकसभेच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आज रोजी मोहोळ तालुक्यातील पापरी व खंडाळी गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून गावकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि गावच्या विकासासाठी निश्चितपणे मी सोबत असेन अशी ग्वाही खासदार प्रणितीताई शिंदे यांनी दिली.
यावेळी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, अस्लम मुलाणी, उत्तमराव मुळे, दत्ताजी कदम, उत्तम कदम, सुनील वाघमारे, काकासाहेब पाटील, सतीश आबा भोसले, गणेश भोसले, अभिषेक गायकवाड, गणेश मुळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.