महाराष्ट्र

खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाची सूचना उपराष्ट्रपतींकडे

कोल्हापूरमध्ये विधिमंडळाबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाकडून दाखल करण्यात आलेली हक्कभंग आणि अवमान सूचना पुढील कार्यवाहीसाठी राज्यसभेचे सभापती असलेल्या उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे यांनी दिली.

विधान परिषदेत विशेष बाबीअंतर्गत उपसभापती नीलम गोऱहे यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, हक्कभंग सूचनेवर संजय राऊत यांनी दिलेला खुलासा मला उचित आणि समाधानकारक वाटत नाही. संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहे. राज्यातील विधानसभा किंवा परिषदेतील सदस्याने संसदेतील राज्यसभा किंवा लोकसभेतील सदस्याबद्दल तर संसदेतील राज्यसभा किंवा लोकसभेतील सदस्याने एखाद्या राज्यातील विधानसभा किंवा विधान परिषदेतील सदस्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल योग्य ती कार्यवाही त्या त्या सदनातील प्रमुख पीठासीन अधिकारी करत असतात. त्यामुळे हक्कभंग आणि अवमान प्रकरणातील प्रा. राम शिंदे यांनी दाखल केलेली सूचना ही राज्यसभेचे सभापती आणि राज्यसभेचे प्रमुख असलेल्या उपराष्ट्रपतींकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे, अशी माहिती गोऱहे यांनी दिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel