ग्रामपंचायत पितापूरचे सरपंच मोहसीना चिकळली यांचा जुलाह जातीचा दाखला अखेर अवैध
सोलापूर : ग्रामपंचायत पितापूर ता. अक्कलकोट, जि. सोलापूर या ग्रामपंचायतीच्या
सरपंच मोहसीना चिकळ्ळी यांचा जुलाह जातीचा दाखला हा दि.०३/१२/२०२४ रोजी सोलापूर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी सखोल चौकशी अंती जातीच्या पुष्ठ्यर्थ कोणतेही ठोस पुरावे दिले नसल्यामूळे अवैध ठरवले व त्यांचे जुलाह जातीचे जात प्रमाणपत्र जप्त करून त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याबाबत व जातीच्या दाखल्याच्या आधारे घेण्यात आलेले सर्व फायदे माघारी घेण्याबाबतचा आदेश पारित केला.
यात हकिकत अशी की, पितापूर ता. अक्कलकोटची ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली, त्यामध्ये सरपंच पद इतर मागासवर्गीयासाठी राखीव होते. त्यामध्ये मोहसीना चिकळ्ळी यांनी त्यांच्या जुलाह जातीच्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली होती व ते सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर मुजीब नबीलाल नदाफ यांनी मोहसीना चिक्कळी यांचे जात प्रमाणपत्र वैधतेकरीता पाठवल्यानंतर रितसर हरकत उपस्थित केली व जात प्रमाणपत्र हे बोगस व बनावट कागदपत्राच्या आधारे मिळवले असल्यामूळे ते रद्द करण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने चौकशी होवून चौकशी अंती दि.२८/०६/२०२२ रोजी मोहसीना चिकळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केलेला होता. त्याविरूध्द मोहसीना चिक्कळी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली नाही, असा दावा केला. त्यामूळे उच्च न्यायालयाने मोहसीना चिकळी यांची याचिका मान्य करून प्रकरण फेरचौकशीसाठी पाठविले.
प्रकरण फेरचौकशीस आल्यानंतर मोहसीना चिक्कळी यांनी त्या जुलाह जातीच्या असल्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत. ज्या विनकर संस्थाचे रेकॉर्ड मोहसीना चिकळी यांनी सादर केले होते ते सर्व रेकॉर्ड संशयास्पद होते, व त्यामूळे दक्षता पथकाला देखील त्याचे ठोस पुरावे सापडले नाहीत. व मोहसीना चिकळी या जुलाह जातीच्या असल्याचे सिध्द न झाल्यामूळे त्यांचा जुलाह जातीचा जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच सदरहु जात दाखल्याच्या आधार घेतलेले फायदे देखील परत करण्याचाबत संबंधिताना आदेश केलेले आहेत.
या प्रकरणात तक्रारदार यांचे वतीने अॅड अंबरीष खोले यांनी बाजु माडलेली आहे