चाेरट्यांनी झाेपलेल्या महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडले…
विहामांडवा येथील इंदिरानगर वसाहतीमध्ये चाेरट्यांनी अंगणात झाेपलेल्या सविता गाैतम बनसाेडे अाणि त्यांची मुलगी प्रतीक्षा यांना लाकडी काठीने जबर मारहाण करत कानातील सोन्याचे झुंबर, वेल अाेरबडून घेतले, तर मुलीचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ४० हजारांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले.
दरम्यान, चाेरट्यांनी केलेल्या मारहाणीत मायलेकी गंभीर जखमी झाल्या अाहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचाेड पाेलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले अाहे. गौतम बनसोडे व मुलगा ऋषिकेश हे घरात झोपलेले हाेते, तर गौतम बनसोडेंच्या पत्नी व मुलगी घरासमोरील अंगणात झोपलेल्या होत्या. रात्री तीन वाजेदरम्यान एक चोरटा गेटबाहेर थांबला, तर दुसरा चोरटा गेटवरून उडी मारून अंगणात शिरला.
सविता यांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना जाग अाली. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता चोराने लाकडी काठीने जबर मारहाण करत त्यांच्या एका कानातील सोन्याचे झुंबर व वेल ओरबाडून घेतले. यात त्या रक्तबंबाळ झाल्या. अावाजामुळे मुलीलाही जाग आली अाणि ती आरडाओरड करताच तिलाही चोराने काठीने मारत तिच्या जवळील मोबाइल हिसकावून पोबारा केला.
दरम्यान, झाेपेतून जागे झालेले गौतम व त्यांचे बंधू आत्माराम बनसोडे यांनी जखमी सविता बनसोडेंसह मुलीला पाचोड येथे दवाखान्यात हलवले. मात्र, गंभीर जखमी असल्याने मायलेकीला पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
बाजार समितीच्या सीसीटीव्हीत दोन चाेरटे कैद
चाेरट्यांनी सविता बनसाेडे यांच्या ताेंडावर लाकडी काठी मारल्याने त्यांचा जबडा फाटला, तर मुलगी प्रतीक्षा हिच्या पाेटात चाेरट्याने लाथ मारली. सविता यांच्या कानातील सोन्याचे साडेचार ग्रॅमचे झुंबर व दीड ग्रॅमचे वेल ओरबाडून घेतल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन चोरटे हे बाजार समितीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पाेलिस त्यांचा शाेध घेताहेत.