महाराष्ट्र

चुना लावला…! पांड्याचे मुंबईच्या ताफ्यात ‘हार्दिक’ स्वागत अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मागील काही दिवसांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सर्वप्रथम हार्दिक मुंबई इंडियन्सच्या संघात जाणार असल्याची बातमी पसरली.

मात्र, पुन्हा एकदा चर्चांना पूर्णविराम देत तो कायम गुजरातच्या ताफ्यात राहणार असल्याचे समोर आले. परंतु, सोमवारी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीपाठोपाठ हार्दिकने देखील पलटनच्या ताफ्यात जाण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले. हार्दिकची घरवापसी झाल्यानंतर मुंबईचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र भन्नाट मीम्स व्हायरल करून नेटकरी मजा घेत आहेत.

दरम्यान, क्रिकेट वर्तुळात मागील दोन दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू असलेला हार्दिक पांड्या आज अधिकृतरित्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य झाला. पांड्याने आपल्या संघात घरवापसी केली असून आयपीएल २०२४ मध्ये तो मुंबईच्या ताफ्यात दिसणार आहे. हार्दिक पांड्याला त्याच्या घरच्या संघात जायचे होते, त्याचीच इच्छा असल्याकारणानेच त्याला मुंबईच्या संघात पाठवले गेले, असे गुजरातच्या फ्रँचायझीने स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel