चौफेर विकासाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प…

महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या पुढील हप्त्यांसाठी या अर्थसंकल्पात ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद महिला वर्गासाठी आश्वासक आहे. महाराष्ट्राच्या आगामी नवीन औद्योगिक धोरणामुळे महाराष्ट्रात ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व त्याद्वारे ५० लाख रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्रातील २४ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट, महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना, नवीन गृहनिर्माण धोरण, प्रधानमंत्री शहरी आवास योजनेत सुविधा, पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान अशा वैशिष्ट्यांसह हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला मोठा हातभार लावणारा अर्थसंकल्प ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही हेच स्पष्ट होते.
–देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य