सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजाचा खरा इतिहास मराठा सेवा संघाने पुढे आणला…

छत्रपती शिवाजी महाराजानी हिंदू किंवा मराठ्यामध्येच नव्हे तर मुस्लमानामध्ये देखिल अस्मिता जागृत केली. त्यामुळे स्वराज्याच्या सेवेत असलेल्या मुस्लीम सैनिकांनी महाराजाच्या काळात एक ही बंड अथवा गद्दारी केल्याचे पहावयास मिळत नाही मात्र खरे शिवाजी महाराज समाज समोर आलेच नाहीत मात्र मराठा सेवासंघाने छत्रपती शिवाजी महाराजाचा खरा इतिहास पुढे आणल्याचे विचार इतिहास संशोधन प्रा.डॉ.चंद्रकांत चव्हाण यांंनी मांडले
मराठा सेवा संघाचा 34 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ सोलापूर शाखेच्या वतीने समाज बंधावाचा गौरव सोहळा आणि इतिहास संशोधन प्रा.डॉ.चव्हाण यांंचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी आपले विचार व्यक्त करताना चव्हाण बोलत होते. यावेळी विचारपिठावर उत्तमराव माने, डॉ. जे. के. देशमुख, दत्ता मुळे, राजन जाधव, सोमनाथ राऊत, दिनकर देशमुख, नंदा शिंदे, निर्मला शेळवणे, अभिजंली जाधव, उज्वला साळंखे उपस्थित होते.
डॉॅ. चव्हाण म्हणाले राजकारणी लोक मराठा तरूणांची माथी भडकावून त्यांचा वापर दंगली घडवण्यासाठी करत असत मात्र मराठा सेवा संघाने मोठ्या प्रमाणात मन परिवर्तन करत दगड काठी ऐवजी पुस्तक हाती दिली वाचनसंस्कृती रूजवली त्यामुळे आज काल पुढार्‍यांना दगंली घडवण्यासाठी मराठा समााजचे तरूण पुढे येत नाहीत हे मोठे काम मराठा सेवा संघोने आपल्या 34 वर्षाच्या काळ केल्याचे त्यांनी सांगितले
प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली. जिल्हाअध्यक्ष डॉ. जी.के देशमुख यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रम घेण्याची भुमिका विशद केली. त्यानंतर विविध .क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणार्‍या समाज बांधवाचा वर्धापन दिनाचे औचित्य साधत गौरव करण्यात आला. धुुनर्धर साईराज हणमे, धर्मराज चटके, नवीपेठ व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय मुळिक संपादकपदावर पदोन्नती मिळालेले, प्रशांत माने, प्रा. गणेश देशमुख, पर्यावरण ..क्षेत्रात काम करणारे महेश देवकर, अभिनव साळुंखे, कृष्णाकांत पवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉ.अरूण गायकवाड या समाज बांधवाचा गौरव करण्यात आला. प्रशांत माने आणि डॉ. अरूण गायकवाड यांनी सत्कारास उत्तर दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश ननवरे, लक्ष्मण महाडिक, परशुराम पवार, विश्वानाथ गातकवाड, नितीन मोहिते, अंबादास सपकाळे, आर. पी. पाटील, सचिन चव्हाण, श्रीनिवास सावंत, दीपक शेळके यांनी प्रयत्न केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव पवार यांनी केले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel