जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीः आ. सुभाष देशमुख
विजयानंतर ग्रामस्थांशी साधाला संवाद; मानले आभार
दक्षिण तालुक्यातील जनतेने तिसर्यांदा आपल्यावर विश्वास दाखवून विक्रमी मतांनी निवडून दिले. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जातीच राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी भाजपला मतदान केले आहे. प्रत्येक परिवार, प्रत्येक व्यक्ती केंद्रबिंदू मानून गावाचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मतदार संघातील ग्रामस्थांशी जनसंवाद आणि आभार मानण्यासाठी शुक्रवारी आ. देशमुख यांनी तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. आ. देशमुख यांनी कुडल, हत्तरसंग,बरुर, चिंचपूर, सादेपूर, टाकळी, औज मंद्रुप, लवंग यासह अनेकगावांना भेटी दिल्या.
आ. देशमुख म्हणाले की, आता सर्वांनी एकत्र येऊन तालुक्याचा आणखी जास्त विकास करण्याचा प्रयत्न करू. तालुक्याने जो विश्वास दाखवला तो विश्वास नक्की सार्थकी करणार आहे. येणार्या 5 वर्षात कोणत्या गावात काय कामे करायची याचे नियोजन ग्रामस्थांनी करावे, ती कामे आपण निश्चित पूर्ण करू. शासनाच्या अनेक योजना आहेत, गावकर्यांनी त्याचा लाभ घ्यावा, शेतीपूरक व्यवसाय करावा, महिलांनी घरगुती व्यवसाय सुरू करावा, युवकांनी नवीन उद्योग उभारावे यासाठी आपण लागेल ती मदत करण्यास तयार आहे.
या संपूर्ण दौर्यात तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, चनगोंडा हाविनाळे, अंबिका पाटील, नामदेव पवार, सोमनाथ केंगनाळकर, जगन्नाथ गायकवाड, पंडित पूजारी, चिदानंद पुजारी, जगन्नाथ गायकवाड, सरपंच राजकुमार हालमनी, धर्मराज पुजारी, तिपण्णा पाटील, कमलाकर बिराजदार, कल्लाप्पा भतगुणकी, मल्लिकार्जुन बिराजदार, मधुकर बिराजदार, शरणाप्पा भतगुणकी, गुरुसिद्ध बिराजदार, सुरेश बगले, सोमनाथ बगले, भिमाशंकर चडचण, सिद्धाराम जानकर, अशोक चडचण, शिवा कोणदे, सिद्धाराम कोणदे, संगण्णा हत्तरसंग, शिवकुमार चोरमोले, भौरवा कोळी, सतीश कोळी,सिद्धाराम घोडके, महांतेश बिराजदार,संगमेश्वर बिराजदार,भुताळी घोडके महेंद्र उंबरजे,यतीन शहा,रायप्पा बने, इरप्पा बिराजदार व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत
दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आ. सुभाष देशमुख यांचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी आ. देशमुख यांचे औक्षण केले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली