राजकीय

जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात राजू साळुंखे यांना अटक – किरीट सोमय्या

पुणे येथील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात लाईफलाईन हॉस्पिटलचे राजू साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. राजू साळुंखे हे संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचे व्यावसायिक भागीदार आहेत, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कोविड काळात पुण्यातील शिवाजीनगर येथे जंबो कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुजीत पाटकर आणि राजू साळूंखे यांची भागीदारी असलेल्या कंपनीला कोविड सेंटर उभारण्यासाठी कंत्राट दिले. कोविड सेंटर उभारण्यासाठी दोघांनी बोगस कंपनी निर्माण केली. तरीही ठाकरे सरकारने त्यांना कंत्राट दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी राजीव साळुंखे यांच्यासह पुण्यातील लाईफलाईन हॉस्पिटलचे भागीदार सुजीत पाटकर, हेमंत गुप्ता, संजय शहा यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्यातील राजू साळूंखे यांना आता अटक करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू

दरम्यान, सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार आहेत. या जंबो कोविड सेंटरमध्ये तीन कोविड पेंशटचा निष्काळजीपणे मृत्यू झाला होता, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला होता. त्यामुळे उर्वरित आरोपींवरही तातडीने कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

कोण आहेत सुजित पाटकर?

सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या आरोपाला संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचे म्हटले होते. ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी राऊतांच्या अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावे होती. दरम्यान, या पुण्यातील लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे.’ असे सुजित पाटकर म्हणाले होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel