सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्र

जिल्हा किशोर खो-खो स्पर्धेत मरवडेच्या छत्रपती खो-खो क्लबला विजेतेपद

जिल्हा 14 वर्षांखालील किशोर खो-खो स्पर्धेत मरवडेच्या (ता. मंगळवेढा) छत्रपती खो-खो क्लबने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्यांनी शेवतेच्या आदर्श क्लबचा पराभव केला.
सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने मरवडे येथे छत्रपती खो-खो क्लब यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील 16 संघाने भाग घेतला होता. मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी मरवडेचे माजी सरपंच दादासाहेब पवार, निवृत्त रेल्वे पोलीस दामोदर घुले, माजी सरपंच अशोक पवार, माजी विस्तार अधिकारी डॉ.माणिक पवार, धनश्री परिवाराचे नेते संदीप सूर्यवंशी, उद्योगपती ॲड.राजाराम येडसे, शेतकरी संघटनेचे नेते दत्तात्रय गणपाटील, युवक नेते सचिन घुले, महेश गायकवाड, सोमनाथ टोमके आदींची  प्रमुख उपस्थिती होती.
बाद पद्धतीने झालेल्या या स्पर्धेमध्ये छत्रपती खो-खो क्लब मरवडे, आदर्श खो-खो क्लब शेवते, लोकविकास खो खो क्लब वेळापूर व आढीव खोखो क्लब या संघांनी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. मरवडे संघाने आढीव संघाचा व शेवते संघांनी वेळापूर संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.  
या स्पर्धेसाठी जिल्हा असोसिएशनचे पंच म्हणून लखन कांबळे, हरिदास शिंदे, विजय फटे, विजय कोटे, भैया कोळी या पंचांचे सहकार्य लाभले. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी छत्रपती खो खो क्लबचे सुदर्शन घुले, मिनाज इनामदार, रोहित कुंभार, उमाजी केंगार, नवनाथ डांगे, रोहन जाधव, नानासाहेब जाधव, नवनाथ बनसोडे, अभिनव पवार, रियाज इनामदार, ब्रह्मदेव कुंभार यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel