महाराष्ट्र

जिल्हा परिषद‎ गटाचे माजी ‎सदस्य बाळासाहेब ‎‎माळी बेपत्ता…

तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद‎ गटाचे माजी ‎ सदस्य आणि ‎ ‎ समता परिषदेचे ‎ ‎ नेते बाळासाहेब ‎ ‎ माळी यांचा ‎ ‎ दुसऱ्या दिवशीही ‎ ‎ शोध लागलेला नाही. करकंब पोलीस ‎ ‎ ठाण्यात माळी यांच्या पत्नीने‎ हरवल्याची तक्रार दाखल केलेली‎ आहे. करकंबचे पोलीस पथक माळी‎ यांचा शोध घेत आहे.‎

बाळासाहेब माळी यांनी सोमवारी‎ रात्री साडेनऊ वाजता आपण‎ आत्महत्या करीत आहोत, आपणास‎ शोधण्याचा प्रयत्न करू नये अशा‎ प्रकारचा संदेश पत्नी, समाज माध्यम‎ आणि पत्रकारांना पाठवला होता.‎ तेव्हापासून त्यांचा मोबाईल स्विच‎ ऑफ आहे. त्यांचे नातेवाईक आणि‎ पोलीस तपास करीत आहेत. माळी‎ यांनी आपल्या दत्त पेट्रोलियम या पेट्रोल‎ पंपाचा व्यवस्थापक आणि आपल्या‎ पुतण्याने एक कोटी २१ लाख रुपयांची‎ फसवणुक केल्याचा आरोप आपल्या‎ संदेशात केला आहे. तसेच पंपाच्या‎ व्यवस्थापकाने आपण तीन खून केले‎ असल्याची धमकीही दिल्याचा‎ उल्लेख माळी यांच्या संदेशात आहे.‎ ‎‎ त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत‎ असून पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक‎ आणि पुतण्याची चौकशी पोलिसानी‎ अद्याप केलेली नाही, असे पोलिस‎ सूत्रांनी सांगितले.‎ मंगळवारी माळी यांच्या पत्नीने‎ करकंब पोलीस ठाण्यात बाळासाहेब‎ माळी हे सोमवारी रात्रीपासून‎ हरवल्याची तक्रार दिली आहे.‎ बाळासाहेब माळी यांच्या सोबत त्यांचे‎ मित्र बंडू भुईरकर आहेत, असे‎ तक्रारीत म्हटले आहे. सोमवारपासून‎ माळी आणि भुईरकर दोघांचेही फोन‎ बंद आहेत. माळी यांचा शोध‎ घेण्यासाठी करकंब पोलीस प्रयत्न‎ करीत आहेत, अशी माहिती करकंबचे‎ सहायक पोलीस निरीक्षक निलेश तारू‎ यांनी दिली.‎‎

बाळासाहेब माळी यांचा मोबाईल ते‎ बेपत्ता झाल्यापासून बंदच आहे.‎ त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्र‎ बंडू भुईरकर यांचाही मोबाईल फोन‎ लागत नाही. त्यामुळे मोबाईल‎ लोकेशन तपासण्यात पोलिसांना‎ अडचण येत असावी. कालपासून‎ माळी आणि भुईरकर परिवार -‎ नातेवाईकांसह पोलिसांकडून‎ दोघांचा शोध घेतला जात आहे.‎

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel