जीवघेणा हल्ला व विनयभंग प्रकरणी अटकेतील आरोपीस उच्च न्यायालयातून जामीन
सोलापूर ( प्रतिनीधी):- सोलापूर जिल्हयातील अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक ३६७/२०२३ अन्वये भा.द.वी कलम _३०७,३४१,३५४,३५४-अ,३२३,५०४,५०६ व ३४_ प्रमाणे आरोपी _शाकीर मशाक शेख_ विरुद्ध दिनांक १३/०६/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात यातील फिर्यादी याला आरोपी हा सुमारे ५ ते ६ महिन्यापासून त्रास देत होता.तसेच एके प्रसंगी त्यांनी फिर्यादीची छेडछाड काढली असता रस्त्यात फिर्यादीला अडवले होते.
फिर्यादी विवाहित असून सुद्धा आरोपी फिर्यादीस जाणून बुजून त्रास देत होता. आरोपी हा आपल्या मित्रासोबत फिर्यादीच्या घरी येऊन” तू माझ्यासोबत चल नाहीतर, तुला खल्लास करतो” अशी दमदाटी व शिवीगाळ केली होती. त्या प्रसंगी फिर्यादीचे पती आरोपीस वरील वाईट कृत्य संबंधित विचारले असता ,आरोपीने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने सोबत आणलेल्या चाकूने फिर्यादीचे पतीचे पोटात खूपसून गंभीर जखमी केले होते आणि फिर्यादीच्या पतीच्या पोटातून रक्त आलेले पाहून घरातील इतर लोकांनी त्यांना यातायात सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केले होते आणि त्याच्यावर खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती. आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र सोलापूर येथे फेटाळण्यात आला होता. तसेच त्यानंतर आरोपीने आपला जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयातील _न्यायमूर्ती एम एस कर्णिक_ यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. आकाश कवडे, ॲड. दत्तात्रेय कापुरे यांनी उच्च न्यायालयात काम पाहिले.