ज्योतीताईंनी मोची, पद्मशाली आणि लोधी समाजासाठी मागितले महामंडळे…
दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्यावतीने आझाद मैदानावरील घेण्यात आलेल्या मेळाव्यात राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचे तडफदार भाषणावर झाले. दसऱ्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्योती वाघमारे गेले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. भेटी दरम्यान ज्योती वाघमारे यांनी स्वतःसाठी काहीही न मागता आमच्या समाजातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी तीन महामंडळे मागत त्यांना प्रत्येकी शंभर कोटीचा निधी देण्यात यावा अशी मागणी वाघमारेंनी केली.
मोची समाजासाठी बाबू जगजीवन राम आर्थिक विकास महामंडळ, पद्मशाली समाजासाठी श्री मार्कंडेय महामुनी आर्थिक विकास महामंडळ आणि लोधी समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे व या तिन्ही महामंडळांना प्रत्येकी 100 कोटींचा निधी देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्याच्या महामंडळाच्या बैठकीत निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यावरूनच शहर मध्यची दावेदारी ही ज्योती वाघमारे यांची निश्चित असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे विधानसभेतील सोलापूर शहर मध्ये ची जागा ही ज्योती वाघमारे यांना सुटणार असल्याची व त्यांची प्रबळ दावेदारी असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
विजयादशमी सणाच्या दिवशी आझाद मैदानावरील झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रणिती शिंदे यांच्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे व रश्मी ठाकरे यांनाही यांच्यावर ही तोफ डागली.