सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर राजकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याबद्दल जो पर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तो पर्यंत काँग्रेस पक्ष आंदोलन सुरू ठेवणार :- खा. प्रणिती शिंदे

खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सन्मान मोर्चा, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

राज्यसभेत अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी, अमित शहांनी माफी मागावी, त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावी या मागणीसाठी, सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिती ताई शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा” डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आली. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देऊन अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
यावेळी अमित शहा विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता, समानता आणि न्यायाचा आदर्श पाळण्याचा सल्ला भाजपला आवडला नाही, इतकेच नव्हे तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून संघ व भाजपचा मनुवादी मानसिकता उघड केली. अमित शहा असे म्हणाले कि, आता फॅशन झाली आहे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर यांच्या नावा ऐवजी देवाचे एवढे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेला असता. पण आम्हाला भाजपचा स्वर्ग नको देशातील जनतेच्या ताकदीवर स्वर्ग निर्माण करू. भाजपच्या आरक्षण संपवण्याच्या कटाचा भाग म्हणून संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न २०२४ च्या निवडणुकीत जनतेने हाणून पाडला आणि कुबड्या घेतलेले सरकार स्थापन करण्यास भाग पाडून लोकशाही मूल्यांचा धडा शिकवला. मात्र हा राग आता राज्यघटनेच्या निर्मात्यावर भाजप काढत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्यात आला आहे. पण खेदाची बाब म्हणजे अमित शहांना यांना धडा शिकवण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करत आहेत. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, मात्र मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणे गुन्हा मानायला तयार नाही. भाजपने संसदेचे कामकाज रोखले. एवढेच नाही तर आपल्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस खासदारांना मारहाण करून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना खाली पाडण्यात आले. भाजपने षड्यंत्राचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. भाजप आणि त्यांची मूळ संघटना नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानविरोधी राहिली आहे. त्यांनी तिरंगा आणि संविधान बनविल्यापासूनच विरोध केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेस पक्ष ठाम आहे. जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.

या सन्मान मोर्चात खासदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, प्रदेश सरचिटणीस संजय हे, सुशीला आबुटे, मा. नगरसेवक प्रवीण निकाळजे, रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे, आशाताई म्हेत्रे, मधुकर आठवले, दत्तू बंदपट्टे, मनोज यलगुलवार, अशफाक बळूरगी, सुदीप चाकोते, प्रमिला तुपलवंडे, गणेश डोंगरे, रॉकी बंगाळे, नजीब शेख, नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, केशव इंगळे, बसवराज म्हेत्रे, हणमंतू सायबोळू, विश्वनाथ साबळे, संध्याताई काळे, संघमित्रा चौधरी, हेमा चिंचोलकर, मिरा घटकांबळे, वाहिद बिजापुरे, महेश लोंढे, देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लखन गायकवाड, बंटी चंदनशिवे, भोजराज पवार, अशोक कलशेट्टी, रवी आंबेवाले, अनिल मस्के, सिद्धाराम चाकोते, तिरूपती परकीपंडला, हारून शेख, सुमन जाधव, करीमुनिःसा बागवान, निशा मरोड, दिनेश म्हेत्रे, श्रिशैल रणधीरे, रमेश हसापुरे, संतोष सोनवणे, गिरिधर थोरात, विवेक कन्ना, रुपेश गायकवाड, राजेश झंपले, शोभा बोबे, सोहेल पठाण, शिवशंकर अंजनाळकर, संजय गायकवाड, विवेक इंगळे, सुभाष वाघमारे, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, रमेश कोळी, एजाज बागवान, धोंडप्पा तोरनगी, सोहेश पठाण, नागनाथ शावणे, व्यंकटेश बोम्मेन, अशफाक बेलीफ, सुनील सारंगी, ज्योती गायकवाड, सुरेखा साबळे, मल्लेश सुर्यवंशी, आकाश कांबळे, सुधाकर शिवशक्ती, रुपेश साबळे, अंमित लोंढे, मयूर तळभंडारे, माया कांबळे, छाया हिरवटे, अभिषेक पाटोळे, निखिल पवार, सोहेब कडेचुर, मुमताज शेख, पूजा चव्हाण, रुकैय्या बिराजदार, सुनंदा वटकर, विजयालक्ष्मी झाकने, अनिता भालेराव, मुमताज शेख, सुनिता व्होटकर, नागेश नाईक, योगेश रणधीरे, जबार शेख, सोहेल डंके, सादिक बागवान, अन्वर फनिबंद, इलियास डंके, जैनु शेख, चंद्रकांत नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel