ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
तब्बल दोन महिन्याच्या सुट्ट्या नंतर शनिवारपासून शाळांना सुरुवात झाली .विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान एमआयडीसी परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्यामंदिर शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात राबविण्यात आला.
ढोल ताशाच्या गजरात शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक शंकर चौगुले, सचिवा सौ शारदा शंकर चौगुले, संचालक नागराज चौगुले, मुख्याध्यापिका सौ सविता गायकवाड, हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री शहाजी निळ सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सुनील नगर भागात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी वस्त्र परिधान करून घोड्या वर होत ही प्रभात फेरी निघाली. “सारे शिकूया… चला शाळेत जाऊया” अशा घोषणा यावेळी प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्या. प्रारंभी शाळेत प्रथमच वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर संस्थेचे संस्थापक शंकर चौगुले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन शैक्षणिक वर्षातील मुलांना गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिवा सौ शारदा चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने त्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुलांनी संस्थेच्या सचिवा शारदा चौगुले यांच्या वाढदिनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. दरम्यान शाळांमध्ये प्रशिक्षित व उच्च शिक्षित शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश मोफत गणवेश मोफत मध्यान भोजन मोफत आरोग्य तपासणी मोफत शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन संगणक शिक्षण इत्यादी सुविधांचा लाभ मुलांनी घ्यावे असे आव्हान यावेळी संस्था सचिवा चौगुले यांनी केलं. आपल्या मुलांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी आपल्या परिसरातील बालाजी शिक्षण मंडळ संचालित महात्मा विद्या मंदिर व सोमनाग प्रशाले मध्ये या पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा असे आव्हान देखील यावेळी मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांनी केलं. जल्लोषपूर्ण वातावरणात महात्मा विद्या मंदिर व सोमनाग प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा झाला.
कार्यक्रम चे सूत्र संचालन अत्तार मॅडम यांनी केले.