क्राईममहाराष्ट्र

तरुणाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

जालना शहरातील वसाहत परिसरात असलेल्या पंचमुखी नगर परिसरात सैय्यद नदीम सैय्यद रहीम रा. सुंदरनगर या तरुणाचा रात्री ११ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून आला. किरकोळ करण्यात कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चाकूने भोसकून हा खून करण्यात आला आहे. मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने मयताचा गळा चिरला तसेच छातीवर, पोटावर सपासप वार करून डोक्यावर सुध्दा जबर घाव मारण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन, तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी हलविला.

या खूनप्रकरणात मयताचे वडिल सय्यद रहीम यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयीताविरुद्ध कलम ३०२,३४ नुसार गुन्हा दाखल केला असून दोन्हीही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.रवी शिवनाथ गवारे आणि विठ्ठल उर्फ माऊली बालासाहेब बोंबले दोघेही रा.चंदनझीरा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत तसेच मुख्यआणि ईतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी चंदनझीरा पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चंदनझीरा पोलीस, कदिम जालना पो- लीस ठाण्याचे आधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात ठाण्यात ऊपस्थित होते. पोलीसांनी नातेवाईकांची समजूत घालून ईतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. आणि पोलीस ठाण्यासमोर घेराव घालणारे सर्वजण शांततेत निघून गेले. दरम्यान आता पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हान असून पोलीस आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel