सोलापूर बातमीSolapur court matterक्राईमन्यायालय निर्णयमहाराष्ट्र

तीन तलवारी जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता…

यात हकीकत अशी की,दि.14/10/2019 रोजी 21.05 वा. चे सुमारास .पोटफाडी चौकाचे अलीकडे ग्रामीण पोलीस पोलीस मुख्यालय जवळील संरक्षक भिंतीजवळ रोडवर कोपत्यालगत ,सोलापूर येथे इसम नामे ओजेर ताहेरअली बागवान वय 25 वर्ष,रा घर न 1 ,किसान नगर,अक्कलकोट रोड ,सोलापूर याने रिक्षा मध्ये आपले कबजात वरील नमूद वर्णनाच्या 03 तलवारी बेकायदा बिगरपरवाना विक्री करण्याचे उद्देशाने रिक्षामध्ये जवळ बाळगलेल्या परिस्थिती मिळून आला म्हणून वगैरे मजकुरची फिर्यादी जेल रोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल होती.
या प्रकरणांमध्ये आरोपीतर्फे ॲड अखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल केलेले होते सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले होते. आरोपी तर्फे ॲड अखिल शाक्य युक्तिवादामध्ये आरोपीकडे कोणत्याही तलवारी मिळालेल्या नसून केवळ खोट्या गुन्ह्यामध्ये आरोपीला गोविण्यात आल्याचा मे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती डी.डी.कोळपकर यांनी पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश केला.
या प्रकरणांमध्ये आरोपीतर्फे ॲड.अखिल शाक्य,ॲड अजिंक्य शाक्य,ॲड दर्शना चक्रवर्ती, ॲड अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel