महाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

तुम मुझे बहोत पसंद है ,म्हणत महिलेचा केला विनयभंग-फारूक कमिश्नर वर FIR दाखल…

सोलापुरात घर विक्रीच्या व्यवहाराचा गैरफायदा घेत एका ४३ वर्षीय महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर व संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी फारूक कमिशनर (रा. दारुसलाम अपार्टमेंट, पानगल हायस्कूलच्या बाजूला, सोलापूर) याच्याविरोधात समक्ष पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिला यास्मीन अब्दुल रहुब शेख (वय ४३, व्यवसाय – मजुरी, रा. सितारा चौक, नई जिंदगी, सोलापूर) या स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी त्या मागील पंधरा दिवसांपासून घर शोधत होत्या. याच दरम्यान ओळखीच्या व्यक्तीमार्फत त्यांची ओळख फारूक कमिशनर याच्याशी झाली. त्याने काजलनगर/दारुसलाम अपार्टमेंट परिसरात फ्लॅट विक्रीस असल्याचे सांगितले.
दि. २१ जानेवारी रोजी झालेल्या संपर्कानंतर फ्लॅट पाहणी करण्यात आली व सदर फ्लॅट २२ लाख रुपयांना घेण्याचे ठरले. त्यानंतर दि. ३० जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता फारूक कमिशनर यांनी फिर्यादी महिलेला फोन करून “ईसारा पावती तयार आहे, २ लाख रुपये घेऊन माझ्या घरी या,” असे सांगितले. त्यानुसार महिला व तिच्या मुलीची सासू आयेशा रफिक शेख या दारुसलाम अपार्टमेंट येथे गेल्या.
तेथे देण्यात आलेली ईसारा पावती वाचली असता त्यामध्ये केवळ २५ हजार रुपये ईसारा दिल्याचे नमूद असल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केली असता फारूक कमिशनर यांनी महिलेशी अश्लील, लज्जास्पद व अपमानास्पद शब्दांत संभाषण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घराच्या व्यवहाराऐवजी वैयक्तिक वर्तन करत महिलेला मानसिक त्रास देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेला तात्काळ तेथून निघून घरी परतावे लागले. नंतर कुटुंबीयांशी चर्चा करून तिने समक्ष पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. महिलेनुसार, घर देण्याचे आमिष दाखवून आरोपीने विश्वासघात करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फारूक कमिशनर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.
सदर घटनेमुळे सोलापुरात घर व्यवहाराच्या नावाखाली महिलांची फसवणूक व छळ होत असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नागरिकांनी विशेषतः महिलांनी सावधगिरी बाळगावी व कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी कायदेशीर कागदपत्रांची पूर्ण खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel