सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक
तैमूर शेख यांने पूर्ण केला ६व्या वर्षी रमजानचा पहिला रोजा…

सेवानिवृत्त पोलीस हवालदार ईक्बाल हाजी इब्राहिम शेख यांचा नातू तैमूर तौसीफ शेख ( वय ६ वर्ष ) या बालकाने रमजान महिन्यातील आपला पहिला रोजा आज शुक्रवार दिनांक १४ मार्च २०२५ रोजी पूर्ण केला.
सायंकाळी रोजा इफ्तार वेळी तैमूर शेख याचा गोडधोड खाऊ घालून व पुष्पहार घालून त्याची गुलपोशी करण्यात आली. तैमूर हा दत्त नगर येथील ब्राहो किड्स शाळेत यु केजी मध्ये शिकण्यास आहे.
लहान वयात भर उन्हाळ्यात रोजा पूर्ण केल्यामुळे आई-वडील ,आजी आजोबा व नातेवाईकांनी तैमूर याचे कौतुक करून त्याला शुभाशीर्वाद दिला आहे.