दक्षिण सोलापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन…
महाराष्ट्र नवनिर्माण सेना २५१, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 5.नोव्हेंबर.2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सोलापूर नेहरूनगर बस स्टॉप च्या पाठीमागे गाळा नंबर २३/१ सुंदर मल्टीपर्पज हॉल विजापूर रोड सोलापूर येथे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे.या उद्घाटन समारंभ प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर ,प्रशांत इंगळे लोकसभा अध्यक्ष, जैनुद्दीन शेख शहर अध्यक्ष, रोहित कलशेट्टी जिल्हा सचिव, सत्तार सय्यद जिल्हा उपाध्यक्ष, निलेश भंडारे जिल्हा उपाध्यक्ष, आकाश निंबाळकर शहर उपाध्यक्ष, विशाल गुजले शहर उपाध्यक्ष,पवन देसाई
शहर उपाध्यक्ष, यश महिंद्रकर शहर उपाध्यक्ष,दिनेश हंचाटे शहर उपाध्यक्ष,राहुल अक्कलवाडे शहर उपाध्यक्ष, प्रदीप बंडे शहर उपाध्यक्ष, अनिल भिसे शहर उपाध्यक्ष, सुरेखा गोब्बुर , किआरा बीके तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एम के फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर,जैनुद्दीन शेख,निलेश भंडारे आदींनी मनोगत व्यक्त करीत मनसैनिकांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला.