दोन दिवसीय कसोटी सामना: सोलापूरच्या गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया इलिसियम क्लबचा ७१ धावांनी विजय

सोलापूरच्या गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया इलिसियम क्लबने २६ आणि २७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या दोन दिवसीय कसोटी सामन्यात ७१ धावांनी विजय मिळवत आपला दबदबा सिद्ध केला. या सामन्यात मयंक पाटरे चमकदार कामगिरीसाठी सामनावीर (Player of the Match) म्हणून गौरवण्यात आले. त्यांनी पहिल्या डावात ९५ चेंडूत ८० धावा फटकावत महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि गोलंदाजीत ११ धावांत २ बळी घेत अप्रतिम कामगिरी बजावली.
सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सम्राट बोबडे यांची निवड करण्यात आली. त्यांनी ७.२ षटकांत १ निर्धाव षटकासह १८ धावा देत ६ बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला पराभवाच्या उंबरठ्यावर आणले.
तसेच, सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून पुन्हा एकदा मयंक पाटरे यांना गौरवण्यात आले. त्यांच्या ८० धावांच्या खेळीमुळे संघाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
२६ आणि २७ डिसेंबर रोजी झालेला हा सामना अतिशय चुरशीचा ठरला असून गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया इलिसियम क्लबच्या या विजयामुळे त्यांच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे