सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्रसोलापूर धार्मिक

धनगर समाजाने आरक्षणाचा भंडारा उधळला…

आज सोलापूर िल्हाधिकार्‍यांना सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे राज्यव्यापी आंदोलन होणार असल्याचे निवेदन दिले धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा या एकाच मागणीसाठी बहुजनांचे आराध्य दैवत मल्हारी मार्तंड खंडेराया जेजुरी येथे भंडारा उधळून पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी धनगर बांधव मोठ्या संख्येने पंढरपूरला येणार आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवतीर्थावरती सकल धनगर समाजाच्या वतीने प्राणांतिक उपोषणाची सुरुवात केली जाणार आहे गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाला घटनेने दिलेलं एसटी च आरक्षण नाही पंढरपूर ते बारामती यात्रा झाल्यानंतर बारामती मध्ये धनगर बांधवांचे उपोषण सोडताना राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व शिवसेनेचे सुभाषजी देसाई यांनी लिखित आश्वासन दिले होते महायुतीच सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो परंतु यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही या अगोदरही अनेक सरकारने नेत्यांनी आश्वासन दिली परंतु ते पाळली गेली नाहीत महाराष्ट्रातील धनगर बांधवांमध्ये असंतोष असून तो असंतोष लोकसभा निवडणुकीमध्ये समाज बांधवांनी दाखवला आहे आत्ता सुप्रीम कोर्टाने सुद्धा सकारात्मक निर्णय दिला असून राज्य सरकारलाच अंमलबजावणीचे अधिकार दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे देशांमध्ये महायुतीचं सरकार आहे या सरकारने तातडीने आरक्षण देणे गरजेचं आहे अन्यथा संपूर्ण धनगर समाज महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभाठा गट यांनीही कधी धनगर बांधवांचा विचार केला नाही म्हणून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीत काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलेला आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा हे पंढरपूरचं आंदोलन शेवटचा असेल इथून पुढे या सरकारला झोकावच लागेल म्हणून आज सोलापूर जिल्ह्यातील आरक्षण चळवळीतील समाज बांधवांच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं दिनांक एक तारखेला जेजुरीतून यात्रेला सुरुवात होईल राज्यातील प्रत्येक बहुतांश तालुक्यात ही यात्रा फिरून नऊ तारखेला पंढरपूरच्या शिवतीर्थावरती निर्णायक आंदोलन होणार आहे हे निवेदन देण्यासाठी चेतन नरोटे शिवाजी बंडगर माऊली भाऊ हळणवर प्रा सुभाष मस्के आमोल बापु कारंडे. अर्जुन सलगर सुनील बडंगर याचे सह पदाधिकाऱ्यांसह समाज बांधव उपस्थित होते

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel