सोलापूर बातमीजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमहाराष्ट्रसोलापूर महानगरपालिका

नगरसेवक आणि महापालिका आयुक्त यांची जबाबदारी काय..?

सोलापुरातील नई जिंदगी परिसर गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईन मधून घाण पाणी रस्त्यावर येत आहे. या बाबत अनेक वेळा नई जिंदगी भागातील नागरिकांनी तक्रार करून देखील महानगरपालीकेच्या प्रशासनाने ड्रेनेज लाईन दुरुस्त केली. त्यात नई जिंदगी परिसरात निधन झालेल्या नागरिकाची अंत्ययात्रा घेऊन जात असताना नागरिकांना रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचा पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जाणाची वेळ आली आहे….

दिवसभर रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पाण्याचा दुर्गंध तर होताच शिवाय आज संध्याकाळी सोलापूर प्रशासनाला लाज वाटावा असे दृश्य दिसून आले आणि ते म्हणजे चक्क साचलेल्या ह्या घाण पाण्यातून एक अंतयात्रा जाताना दिसले …! किती भयानक हा प्रकार… आणि हे असं किती दिवस चालणार.? सोलापूरकर अजून किती दिवस त्रास सहन करणार त्याचे उत्तर मात्र कोणी नगरसेवक देणार नाही किंवा संबंधित महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडे आहे

सोलापुरातील अतिशय गजबजलेला परिसर नई जिंदगी… दाट लोकसंख्या असलेल्या नई जिंदगी परिसरात एकुलत्या एक मुख्य रस्त्यावर दररोज अनेक वाहनांची प्रचंड वर्दळ असते रस्त्यावरून दुचाकी तीन चाकी वाहने चार चाकी वाहने माल ट्रक व मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे जाणारे डंपर च्या गाड्या अगदी सुसाट वेगाने पळत असतात 2025 वर्षाच्या सुरुवातीलाच या जानेवारी महिन्यात शहरात या भरधाव जाणाऱ्या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या डंपर्समुळे अपघात झालेला… तर हे झाले सोलापुरातील रस्त्यांवरील वाहतूक समस्या.. पण आज शहरातील नही जिंदगी चौकात एका विचित्र समस्येमुळे अनेक वाहनधारक मेटाकुटीला आलेले पाहायला मिळाले अक्षरशः आपले जीव मुठीत धरून वाहनधारक आपले वाहने चालवत होते नई जिंदगी चौका तिल रस्त्यावर आज सकाळपासूनच गटारीतील घाण पाणी दिसून येत होते

प्रभाग वीस व 21 मधील संबंधित या रस्त्यावर दिवसभर घाण महिला मिश्रित पाणी साचलेले होते त्यातून भयानक दुर्गंधी सुटलेला…
आणि हे प्रकार हे आजचे नसून बऱ्याच दिवसांपासून आहे नई जिंदगी परिसरात असलेल्या प्रभाग क्रमांक 20 व 21 चे माझी नगरसेवक महापालिका आयुक्त व संबंधित झोन अधिकारी यांना या प्रकाराबद्दल माहितीच नाही का या समस्येच्या गांभीर्य कळत नाही असं वाटतं…
सोलापुरातील नागरिक अनेक प्रकारचे कर भरून सुद्धा त्यांना रस्त्यावरून जाताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि हे आता नीत्याचेच झाले आहे पण असं का होतंय कशासाठी होतोय याचं उत्तर कोणाकडेही नाही उत्तर एकच मिळतं कर्मचारी उपलब्ध नाही…!

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel