सोलापूर सामाजिकमहाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर धार्मिकसोलापूर बातमीसोलापूर राजकीय
नितेश राणेंचा पुतळा दहन;सोलापुरात नितेश राणे आल्यास गटारीच्या पाण्याने अंघोळ घालणार..
सोलापुरातील संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने भाजप आमदार नितेश राणे यांचा पुतळा दहन करण्यात आला आहे.श्रीरामपूर येथील भाषणानंतर नितेश राणेवर राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.एका विशिष्ट समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्याने नितेश राणेचा विरोध केला जात आहे.मंगळवारी दुपारी अतिशय गोपनीय रित्या संघर्ष सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सात रस्ता येथे नितेश राणेंचा पुतळा दहन केला.नितेश राणेंचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.राणे हे नेहमी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत आहेत,आगामी काळात नितेश राणे सोलापुरात आले तर गटारीच्या पाण्याने अंघोळ घालणार असल्याचा इशारा दिला आहे.