राजकीयमहाराष्ट्र

‘नीतेश राणे यांची उंची माझ्या शर्टाच्या गुंडी एवढी’ -संग्राम जगताप

इथला स्थानिक आमदार माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही, अशी टीका भाजप आमदार नीतेश राणे यांनी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर केली होती. यावरुन, संग्राम जगताप यांनी देखील ‘नीतेश राणे यांची उंची माझ्या शर्टाच्या गुंडी एवढी आहे’, असे म्हणत खिल्ली उडवली आहे.

अहमदनगरला काही दिवसांपूर्वी शहरातील कापड बाजारातील व्यापाऱ्यावर हल्ला झाला होता. याप्रकारणी नीतेश राणे यांनी या व्यापाऱ्याची भेट घेतली होती. यावेळी नितेश राणेंनी आक्रमक होत हल्ला करणाऱ्या आरोपींना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता. तसेच राणे यांनी यावेळी बोलताना महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना शिवी दिली होती.

काय म्हणाले होते राणे?

नीतेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राप जगताप यांच्यावर टीका केली होती. राणे म्हणाले, स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार काय? माझ्या नजरेला उभा राहत नाही तो. उगाच माझ्या वाटेला येऊ नका. 2024 मध्ये जो कार्यक्रम करायचा ना तो एकदाच करून टाकायचा. मी स्वतः प्रचाराला येणार आणि एकदाच या लोकांना हिंदुंची ताकद दाखवणार अस इशारा नितेश राणे यांनी दिली होती.

संग्राम जगताप यांचे प्रत्युत्तर

नीतेश राणे यांनी केलेल्या टीकेवर आमदार संग्राम जगताप यांनी देखील जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. संग्राम जगताप म्हणाले, आज नगर शहरात स्वाभिमान नसलेला एक आमदार आला होता. स्थानिक आमदार माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. असे त्यांनी सांगितले. निश्चितच थोडा उंचीचा प्रॉब्लेम असल्याने नजरेला नजर मिळवू शकत नाही. माझ्या शर्टाच्या पहिल्या गुंडी एवढीच त्या आमदारांची उंची आहे. त्यांना नजरेला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावे कुठल्या ठिकाणी यायचे, आम्ही तयार आहोत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel