सोलापूर बातमी

नीलम नगर श्री सद्गुरु रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठाचा उपक्रम

वृक्षारोपण ही काळाची गरज : अभिनव पट्टदेवरु

वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. वृक्ष असतील तरच पर्जन्यमान आहे. थोडक्यात ‘जल है तो कल है” ही म्हण परिपूर्ण होण्यासाठी वृक्ष असणे गरजेचे आहेत त्याचे केवळ रोपण करून नागरिकांनी थांबू नये तर त्याची जोपासना संवर्धन करावे असे विचार एमआयडीसी परिसरातील निलम नगर येथील श्री सद्गुरु रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु यांनी मांडले. श्री चौडेश्वरी यात्रेनिमित्त ३०० सुवासिनी महिलांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षांचे वाटप यावेळी करण्यात आले.

श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अभिनव उपक्रम राबविला असून ३०० सुवासिनी महिलांना मैंदर्गी मठाचे अभिनव रेवनसिद्ध पट्टदेवरु यांच्या दिव्य सानिध्यात 300 झाडांचे वाटप करण्यात आले यावेळी मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी, उपाध्यक्ष सुनील अरळीकट्टी, सिद्धाराम बंटनूर, कुमार पायाणी, शिवशरण कल्लूर, प्रभाकर संकणा, श्रीरामलिंग चौडेश्वरी यात्रा उत्सव अध्यक्ष मल्लिनाथ माशाळे, चन्नप्पा देगील,सिद्धाराम अरळीकट्टी,सिद्धाराम तडकल,राहुल हरनुर, ईश्वर पाटील, शिवलिंगप्पा जेऊरे, शिवशरण चितली,बसवराज कल्लूर, मठाचे विश्वस्त गुंडप्पा अरळीकट्टी राजकुमार धनगुंडे, बसनिंगप्पा देगील, शिवशरण बंडे आदींची उपस्थिती होती प्रारंभी यावेळी श्री अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू यांच्या दिव्य सानिध्यात आणि त्यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण होऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel