सोलापूर बातमीsolapurpoliceदेश - विदेशमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक
नुरानी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने इफ्तेकार जहागीरदार यांचा सत्कार…
सोलापूर – केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, ही म्हण सर्वांनीच ऐकली असेल. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजेच सोलापूर येथील इफ्तेकार जहागीरदार हा तरुण होय. गेल्या दहा वर्षापासून पोलीस भरती ची तयारी करत त्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सोलापूर SRPF बल गट क्र.10 या परीक्षेची तयारी करून सोलापुरातच एस.आर.पी.एफ बल गट क्रमांक 10 सोलापूर येथे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी त्याची निवड झाली आहे. मासे विकणारा तरुण इफ्तेकार जहागीरदार यांची एस.आर.पी.एफ बल गट क्रमांक 10 पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल नुरानी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने इफ्तेकार जहागीरदार यांचा सत्कार करणात आला.