नॅशनल गेमच्या निवड चाचणीसाठी सोलापूरच्या ७ खो-खो खेळाडूंची निवड…
धाराशिव येथे रविवार ५ जानेवारी रोजी होणाऱ्या नॅशनल गेम्सच्या निवड चाचणीसाठी सोलापूर जिल्ह्यातून ४ पुरुष व २ महिला खो-खो खेळाडूंची निवड करण्यात आली.
जिल्हा खो-खो निवड चाचणी उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने ह. दे. प्रशालेच्या मैदानावर झाली. यात 30 खेळाडूंनी भाग घेतला होता. यातून निवड समिती सदस्य श्रीरंग बनसोडे, उमाकांत गायकवाड व अतुल जाधव यांनी निवड केली. निवड झालेल्या खेळाडूंना सोलापूर ॲम्युचर खोखो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर व सचिव ए. बी. संगवे यांनी शुभेच्छा दिल्या.
—-
निवडलेले खेळाडू : पुरुष : रामजी कश्यप,कृष्णा बनसोडे (अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ, वेळापूर), सौरभ चव्हाण (किरण स्पोर्टस क्लब, सोलापूर), जुबेर शेख ( उत्कर्ष क्रीडा मंडळ, सोलापूर).
महिला : स्नेहा लामकाने (कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब, वाडीकुरोली पंढरपूर , सादिया मुल्ला(किरण स्पोर्टस क्लब, सोलापूर).