महाराष्ट्र

पनवेल हादरलं! मिठाईचं आमिष दाखवून चुलत्याने 5 वर्षीय पुतणीला आडबाजूला नेलं अन्…

नवी मुंबईमध्ये दिवाळीच्या काळातच नात्यांना काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. आपल्या चुलत भावाच्या 5 वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

निर्जनस्थळी नेऊन केला बलात्कार

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली ही पनवलेमधील एका गावामध्ये राहते. तर आरोपी हा तिचा चुलत चुलता आहे. आरोपी वाशीमध्ये वास्तव्यास असतो. दिवाळीनिमित्त तो गावी गेला होता. रविवारी सायंकाळी तो या चिमुकलीला मिठाई घेऊन देतो असं सांगत स्वत: बरोबर घेऊन गेला. त्यानंतर या नराधमाने गावातील एका निर्जनस्थळी या चिमुकलीला नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला असं आरोप या मुलीच्या कुटुंबियांनी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तळोजा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करु घेतला आहे.

आईने केली तक्रार

आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी आरोपीला अटक करण्यात तळोजा पोलिसांना यश आलं. पोलिसांनी स्थानिक कोर्टासमोर आरोपीला हजर केलं. कोर्टाने आरोपीला 18 नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश खालदाते यांनी दिली आहे.

या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल

भारतीय दंड संहितेचं कलम 363 (अपहरण), कलम 376 (2)(f) (अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे) याबरोबरच पॉस्को कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इनस्टाग्रामवरुन भेटल्यानंतर बलात्कार

काही काळापूर्वीच नवी मुंबई पोलिसांनी एका 14 वर्षीय मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता. या तरुणीने इन्स्टाग्रामवरुन भेट झालेल्या एका तरुणाविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. या मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याने ती गरोदार राहिली होती. हे दोघेही जानेवारी 2021 मध्ये इन्स्टाग्रामवरुन एकमेकांशी पहिल्यांदा बोलू लागले. ही मुलगी तुर्भेमध्ये राहणारी आहे. हे दोघेही बोलता बोलता प्रेमात पडले. या मुलीला तरुणाने घरी बोलून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ही मुलगी मे 2023 मध्ये गरोदर राहिली, असं पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलं होतं. या तरुणाच्या आईला संपूर्ण प्रकरणाची माहिती होती. तरीही तिने याविरोधात कोणताही आवाज उठवला नाही किंवा आक्षेप घेतला नाही. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तरुण आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचाही तपास सुरु आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel