सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

परभणी येथील संविधानाच्या प्रतिमेची विटंबनेचा जाहीर निषेध, प्रकरणातील मास्टरमाईंड शोधून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी:- चेतन भाऊ नरोटे

परभणी मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना एका माथेफिरू कडून करण्यात आली याचा सोलापूर शहर काँग्रेसकडून निषेध करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्यासोबत शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मा. संतोषकुमार देशमुख साहेब यांना निवेदन दिले.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, परभणी शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना एका माथेफिरू कडून करण्यात आली. या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. देशातील सर्व माथेफिरुंना फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच पुतळे दिसतात काय विटंबना करायला? देशात व राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मांत मतभेद निर्माण करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना लिहिली, त्या घटनेची, संविधानाची सरकारकडून पायमल्ली होत आहे. संविधान बदलू असे म्हणणाऱ्या माणसांनाही सरकार राजाश्रय देत आहे. परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोडीची घटना ही निंदनीय घटना सुनियोजित कट तर नाही ? परभणी येथील संविधान प्रतिकृतीची तोडफोडीच्या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. याप्रकरणी राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन या घटनेचा आरोपीचा मास्टरमाईंड कोण ? हे कृत्य करून दंगलीचे षडयंत्र रचले तर नाही ना? तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात EVM विरोधात आंदोलन सुरू आहे यावरून लक्ष हटविण्यासाठी जाणून बुजून केलेला प्रयत्न आहे का? याची सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, D ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, माजी नगरसेवक NK क्षीरसागर, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळू, भीमाशंकर टेकाळे, राहुल वर्धा, लखन गायकवाड, संध्याताई काळे, मिरा घटकांबळे, शुभांगी लिंगराज, संजय गायकवाड, राजन कामत, सुभाष वाघमारे, नागनाथ शावने, तिरूपती परकीपंडला, धीरज खंदारे, परशुराम सतारेवाले, अंकुश बनसोडे, गिरिधर थोरात, शिवशंकर अंजनाळकर, नागेश म्हेत्रे, करीमुनिस्सा बागवान, शिवराज गोरे, दिनानाथ शेळके, मुमताज शेख, विजयालक्ष्मी झाकणे, मुमताज तांबोळी, व्यंकटेश बोम्मेन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel