न्यायालय निर्णयSolapur court matterमहाराष्ट्रसोलापूर बातमी

पाँक्सो कायद्यांतर्गत -अल्पवयीन पिडीते-सोबत प्रेमसंबंध प्रियकरास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर….

अल्पवयीन मुलीचा अज्ञात पणाचा फायदा घेऊन आई-वडिलांच्या रखवालीतून तिला फुस लावून घेऊन गेल्याचे आरोपातून आरोपी सुमित हरि भोई (रा. बेगमपूर.ता-मोहोळ) याच्या विरुद्ध कामती पोलीस स्टेशन येथे गुन्हे क्रमांक – ३९४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता चे कलम ६४(१),८७,१३७(२) तसेच (Pocso) बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ४,८,१२ प्रमाणे दि- १५/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. सबब प्रकरणात पिडीताही दि-१४/१२/२०२५ रोजी आरोपी सुमित भोई याच्या प्रलोभनाला बळी पडून त्यासोबत निघून गेली होती व आरोपीने आपण लग्न करू असे तिला सांगितले होते. तदनंतर आरोपीने पिडितेस पुढील ४ दिवस आपल्या सहवासात ठेवले होते आणि अत्याचार केले असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. दि- १८/१२/२०२५ रोजी आरोपीने पिडीतेला तिच्या घरी सोडले होते. परंतु पिडीत ही अज्ञान असून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन केलेल्या अत्याचाराबाबत तिने आपल्या घरच्यांना माहिती दिली व आरोपीने तिस कशाप्रकारे विविध प्रलोभने दिली होती व पिडिता ही त्यास कशी बळी पडली होती याचा उल्लेख सदरच्या फिर्यादीत नमूद होता. गुन्हा दाखल होतास सदर प्रकरणात आरोपींनी आपलं अटकपूर्व जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. मेहरबान न्यायालयास आरोपीच्या वकिला मार्फत असा युक्तिवाद करण्यात आला की आरोपी व फिर्यादी यांची प्रेम-प्रकरण असून त्यातून ही घडलेली ही घटना आहे. तसेच एका गल्लीतील रहिवासी असल्याकारणाने एकमेकांच्या कुटुंबीयांना देखील सदरची बाब ही ज्ञात आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी .एन. सुरवसे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज दि-१०/०२/२०२६ रोजी ‌सशर्त मंजूर केला आहे.वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड‌. दत्तात्रेय कापुरे,ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे,ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनीष बाबरे,ॲड. रोहित थोरात, ॲड. अजय वाघमारे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ‌ॲड.बागल यांनी काम पाहिले…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel